करमाळा पुणे

करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी आपण वचनबद्ध असून जन्म भूमिशी असलेलं तुमचं नातं मला राजकीय जीवनात प्रेरणा देऊन जात असल्याचे माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांनी बोलून दाखवले. पुणे येथील एका कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. कामासाठी पुणे येथे असलेल्या करमाळा व कर्जत जामखेड मतदार संघातील कार्यकर्त्यांनी

एकत्र येऊन एका मेळाव्याचे आयोजन केले होते. आमदार रोहितदादा पवार यांचा नागरी सत्कार यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमास करमाळ्याचे माजी आमदार नारायण (आबा) पाटील तसेच शीतलदेवी मोहिते पाटील आणि प्रशांतदादा जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर नगरसेवक गंगाधर (अण्णा) बढे, दीपक शिंदे, डॉ. गणेश राख, सभापती

अतुल पाटील, उपसभापती दत्ता सरडे, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, शेखर गाडे, दीपक देशमुख, नंदकुमार शेळके, संतोष वारे, बलभीम धर्मावत, डॉ. मधूकर खेतमालस, संजय मासाळ, वंदना पाटील, सुरेश कवडे, सुरेश वारकड, बाळासाहेब गायकवाड, शिवडीप उनदरे, बाळासाहेब वाघमोडे, विकास शिंदे (वकील), विकी दिवकते, किरण निकतं, श्रीमंत शेळके, विक्रम कोपनर,

सोमनाथ राख, रामदास बापू राख, अंगद रुपनवर, जयसिंग शिंदे, विक्रम खपसे, बाबुराव अडसूल, सुनील हुलगे, शिवराज पालवे, हनुमंत धालगडे, राहुल गोडगे, आदी मान्यवार उपस्थित होते. मान्यवारांचे स्वागत कार्यक्रमाचे संयोजक तात्यासाहेब वाघमोडे, विकी देवकते आणि विनोद केकाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. यावेळी माजी आमदार नारायण आबा पाटील म्हणाले की, करमाळा तालुक्यातील कामानिमित्त पुणे मुंबई सारख्या स्थलांतरित झालेल्या नागरिकांना भविष्यात अशी वेळ येणार नाही यासाठी गावाकडील त्यांच्या शेतीला उजनीतून पाणी आणि वीज या सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला एक संधी हवी आहे. देशाचे नेते शरदचंद्र पवार यांचे भारतातील शेतकऱ्याच्या विकासासाठी असलेले योगदान व या प्रदीर्घ अनुभवातून निर्माण झालेले त्यांचे विचार माझ्या सारख्या कार्यकर्त्याला राजकीय जीवनात खूप काही शिकवून जातात. यामुळे अशा मेळाव्यातून प्रेरणा घेऊन आपण करमाळा विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी अहोरात्र झटत राहणार असल्याची खात्री माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी यावेळी बोलून दाखगवली. या कार्यकर्ता मेळाव्यास पुणे शहर व परिसरातील करमाळा, कर्जत जामखेड या मतदार संघातील निगडित शेकडो कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली होती. उपस्थितीतांचे आभार तात्यासाहेब वाघमोडे यांनी मानले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *