करमाळा प्रतिनिधी

जय भवानी तरुण मंडळ उमरड या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.  गावातील शालेय विद्यार्थ्यांना घेऊन गणपती समोर मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी गावातील अनेक

ग्रामस्थ उपस्थित होते. दोन तास चाललेल्या या कार्यक्रमातील विविध गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. जुन्या नव्या गाण्यांची मेजवानी पाहून उपस्थित नागरिक खुश झाले व यात सहभागी स्पर्धकांना बक्षिसांचा वर्षाव केला. सामाजिक उपक्रम

राबवणाऱ्या या मंडळाने रोज नवनवीन उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने एक गाव एक गणपती उपक्रम छान पद्धतीने राबवला. यावेळी जयभवानी सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष गोवर्धन कोठावळे, माजी उपसरपंच गणेश चौधरी, मुकेश बदे, किरण

बदे, अण्णा पठाडे, सचिन कोठावळे, प्रदीप चोपडे, प्रमोद बदे, सोमनाथ पठाडे, महेश पठाडे, बंकट बदे, मनोज पठाडे,अंकुश कोठावळे इत्यादी जण उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *