
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील सुभाष चौकात श्री देवीचा माळ येथील राजे रावरंभा तरुण मंडळाची मिरवणूक येताच मुस्लिम समाजाच्या वतीने नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमीरशेठ तांबोळी, इंदाज वस्ताद अफरोज पठाण, सोहेल शेख, तौफिक शेख, समीर दाऊद शेख, नवाज पठाण, समीर सिकंदर शेख, आदी मुस्लिम समाजातील युवकांनी श्री गणराया चे उत्साहात स्वागत केले. यावेळी हजरत महंमद पैगंबर जयंती निमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तसेच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे व पोलीस उपनिरीक्षक माहुरकर व इतर पोलिस कर्मचारी, मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर, नगरसेवक सचिन घोलप, सरकार मित्र मंडळाचे अध्यक्ष वांगडे, सामाजिक कार्यकर्ते विजय लावंड यांचा फेटा बांधून स्वागत करण्यात आले.

गेल्या वर्षा पासून हिंदू आणि मुस्लिम समाजाचे दोन्ही सण एकाच वेळी आल्याने मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मान शेठ तांबोळी यांनी पैगंबर जयंती गणेश उत्सवानंतर साजरी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

…………………….
नगरसेवक हाजी अल्ताफशेठ तांबोळी हे रुपचंद तालीम गणेश उत्सव मंडळ व जय महाराष्ट्र गणेश उत्सव मित्र मंडळ या मंडळाची जबाबदारी ते पुर्ण पणे आजपर्यंत सांभाळत असुन हिंदू मुस्लिम समाजात कसा एकोपा राहील यासाठी ते गेली चाळीस वर्षांपासून प्रामाणिक पणे प्रयत्न करत आहेत.
