
करमाळा प्रतिनिधी
झरे विद्यालयातील सेवक अनंता जिजाबा चौधरी यांना सन २०२४-२५ सालचा आदर्श सेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ दरवर्षी गुणवंत पुरस्काराने सन्मानित करतो. यावर्षी तालुक्यातून चौधरी यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी हा पुरस्कार सोलापूर येथे प्रदान करण्यात आला.

पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंतजी आसगावकर महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुभाष माने तसेच विद्यमान अध्यक्ष तानाजी माने सचिव धर्मवीर संभाजी विद्यालय गौंडरे चे मुख्याध्यापक नीळ सर व माध्यमिक व प्राथमिक चे शिक्षणाधिकारी याच्या हस्ते पुरस्काराचे वाटप करण्यात आले. त्यांच्या सन्मानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बन्शी आबा घाडगे यांनी अभिनंदन केले.

