
करमाळा प्रतिनिधी
कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर राखुंडे यांनी महाआरोग्य शिबिराचे वांगी 3 या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन करताना प्रगतशील बागायतदार रामेश्वर आप्पा तळेकर, ग्रामपंचायत सदस्य नाना तकिक, अर्जुन आबा तकिक, दत्ता बापू देशमुख, गोडगे नाना, भाऊ गोडसे, डॉक्टर विक्रम बेंद्रे, पंकज भोसले, इ. उपस्थित होते. वांगी 3 मधील ग्रामस्थांनी सहभागी होऊन शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात मोफत नेत्र तपासणी, रक्त लघवी तपासणी, महिलांचे आरोग्य तपासणी व मोफत औषधे वाटप करण्यात आले.
