
करमाळा प्रतिनिधी
श्री गिरधरदास देवी विद्यालय, करमाळाचे सहशिक्षक राजेंद्र काशिनाथ चिखले सर यांची करमाळा तालुका गणित मंडळावर अध्यक्ष पदी निवड झाली.

करमाळा या ठिकाणी करमाळा तालुका गणित मंडळाच्या झालेल्या सर्व साधारण सभेमध्ये येथील श्री गिरधरदास देवी विद्यालय, करमाळा चे सहशिक्षक राजेंद्र काशिनाथ चिखले सर यांची सर्वानुमते करमाळा तालुका गणित मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्या या निवडीबद्दल प्रशालेचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी, सचिव अमोद शेठ संचेती, संचालिका सुनीताभाभी देवी, संचालक विजयकुमार दोशी, संचालक चंद्रकांत देवी, मुख्याध्यापक संभाजी जगताप सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
