
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील जरांगे पाटील यांच्या कडून इच्छुक उमेदवारांनी जरांगे पाटील यांची अंतर वाली सराटी येथे जाऊन भेट घेण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे हनुमंत मांढरे-पाटील यांनी देखील नुकतीच जरांगे-पाटील यांची भेट घेऊन आपण इच्छुक असून उमेदवारी बाबतीत चर्चा केली त्यावेळी जरांगे-पाटील बोलताना आपण सद्या तरी कोणतीही राजकीय भूमिका घेणार नसून आपल्याला राजकारण करायचं नसून समाजकारण करायचं आहे, मराठा समाजाला आरक्षण कसे मिळवून देता येईल याचा विचार करायचा आहे. जेव्हा तशी वेळ येईल तेंव्हा मात्र शिक्षण सम्राट, साखर सम्राट व पैशा वाला यांना मी माझ्या दारात पण उभा करणार नाही. आशा लोकांमुळेच माझ्या मराठा लेकरांच वाटोळं झाल आहे. कशाला लागतो पैसा, प्रत्येक गावात मराठा समाज जबाबदारीने आपल्या उमेदवारांना मतदान करून घेईल पन्नास पन्नास लाख रुपये च्या गाड्या घेऊन तुम्ही माझ्या गरीब मराठा समाजाच्या दारात मत मागण्यासाठी जाणार आशा लोकांना मी उमेदवारी देणार नाही. आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या मराठा कुटुंबांतील कार्यकर्ताला मी उमेदवारी देणार आहे भले तो मोटार सायकल वरून प्रचार केला तरी चालेल पण जहागिरदारांना मी उमेदवारी देणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. रस्त्यावर उतरून रस्त्यावरील लढाई लढणारा माझा उमेदवार असेल. एसी मधून फिरणार्यांना मी कधीच उमेदवारी देणार नाही पण सद्या तरी माझी राजकीय भूमिका नाही त्यामुळे जरांगे-पाटील जेंव्हा राजकीय भूमिका घेतील तेव्हा त्यांचा उमेदवार मीच असेल असे मत हनुमंत मांढरे- पाटील यांनी व्यक्त केले आहे.