करमाळा प्रतिनिधी

वाशिंबे ता. करमाळा येथील भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त इयत्ता पहीली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या बुद्धिमत्तेस चालना व वाव देण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांची

बुद्धिमत्ता विकसित व्हावी व भविष्यातील स्पर्धा परीक्षांचा सराव व्हावा यासाठी शनिवार दि.१४रोजी वाशिंबे ता. करमाळा येथे स्पर्धा परीक्षेचा उपक्रम राबविण्यात आला. यामधील यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र, ट्राँफी देऊन सन्मानित

करण्यात येणार आहे. या परीक्षेत शरदचंद्रजी पवार विद्यालय वाशिंबे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाशिंबे येथील एकूण ३७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तसेच भैरवनाथ तरुण मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात १११ रक्तदात्यांनी रक्तदान करत सहभाग नोंदवला. रक्तदान करणार्या प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेट वस्तू देण्यात आली. तसेच गणेशोत्सवानिमित्त दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करून विविध सामाजिक उपक्रम राबवत  सामाजिक बांधिलकीचा संदेश भैरवनाथ तरुण मंडळाने दिला आहे. हे उपक्रम मंडळाच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने पार पडत आहेत. तसेच शरदचंद्रजी पवार विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाशिंबे येथील शिक्षक वृंदाचे ही या उपक्रमास सहकार्य लाभले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *