
करमाळा प्रतिनिधी
डॉ. अक्षय गंगाराम माने धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी आमरण उपोषण करत आहे. आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मी डॉ.अक्षय गंगाराम माने ज्या धनगर समाजात आमचा जन्म झाला आहे तो धनगर समाज हा मूळ आदिवासी आहे तरी पण या समाजाला धनगड व धनगर या शब्दभ्रमातून अनेक वर्षापासून एसटी आरक्षण सवलती पासून दूर ठेवल्याने आमच्या अनेक पिढ्या बरबाद झाल्या.

तरी सरकारने वेळेत जागे होऊन आमच्या हक्काचे एसटी आरक्षण द्यावे यासाठी मी दिनांक 9 सप्टेंबर 2024 वार सोमवार पासून माने शाळा काळेवाडी पुणे 17 येथे बेमुदत आमरण उपोषण करत आहे. समाजातून उपोषणास पाठिंबा मिळत आहे.
यावेळी उपोषणास पाठिंबा देण्यासाठी समाजातील अनेक मान्यवर समाज बांधव उपस्थित होते.
