करमाळा प्रतिनिधी

आज इरा पब्लिक स्कूल चिखलठाण येथे 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुप्रसिद्ध डॉ. अंकुश रामचंद्र तळेकर व डॉ. नंदा अंकुश तळेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी पहिली ते चौथीच्या

विद्यार्थ्यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे “लेझिम”. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यानी अतिशय शिस्तबद्ध व तालबद्ध आपली कला सादर केली. वार्षिक क्रिडा सप्ताहात ज्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली त्या सर्वांना प्रमाणपत्र

व मेडल देऊन गौरविण्यात आले. Junior K.G. च्या श्राव्या वायसे या विद्यार्थिनीने “देश मेरे” या गीत गायनाने सर्वांचे लक्ष वेधले. गणेशोत्सवा निमित्त घेण्यात आलेल्या निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व सर्टिफिकेट

देण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या शेवटी खाऊवाटप करण्यात आले. व्यासपीठावर शिक्षक-पालक संघाचे सदस्य,  प्रमुख पाहुणे डॉ. अंकुश रामचंद्र तळेकर, डॉ. नंदा अंकुश तळेकर, संस्थेचे सदस्य हरिश्चंद्र बारकुंड, संस्थेचे सचिव सुनिल

अवसरे व संस्थेचे अध्यक्ष डॉ. ब्रिजेश बारकुंड सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाघमोडे मॅडम व कोठारी मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन शेख सर यांनी केले. हा देखणा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ड्राइवर बंधू यांनी अथक परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *