करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्याचा भूमिपुत्र मंगेश चिवटे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक वलयात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली असून आज चांद्यापासून बांद्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मंगेशच्या कामाचे कौतुक होत आहे. यामुळे शिक्षक मतदार संघातून मंगेशच्या विजयासाठी पायाला भिंगरी लावून काम करणार असा विश्वास शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर काका लावंड यांनी व्यक्त केला.

करमाळा तालुक्यातील घोटी, कंदर, हिसरे, फिसरे, निंभोरे, वरकुटे या भागातील जवळपास 35 शाळांना भेट देऊन तेथील शिक्षकांना मंगेश चिवटे यांना मतदान करण्याचे आवाहन तालुका प्रमुख सुधाकर लावंड यांनी केले.

यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाप्रमुख महेश चिवटे, वैद्यकीय तालुका समन्वयक नागेश दादा शेंडगे, तुळशी वृंदावन प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद महानवर, शिवसेना तालुका समन्वयक निलेश राठोड आदी जण उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *