
चिखलठाण प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील निर्यातक्षम केळी पिकाचा दर्जा कायम ठेवण्यासाठी फ्रुट केअर मॅनेजमेंट कडे लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय केळी तज्ञ, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष के.बी. पाटील यांनी कंदर तालुका करमाळा येथे के.डी.

एक्सपोर्ट च्या वतीने आयोजित केळी पीक परिसंवाद व कोल्ड स्टोरेज उद्घाटन कार्यक्रमात बोलताना केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख हे होते. पुढे बोलताना पाटील म्हणाले की,

सोलापूर जिल्ह्यात केळी पिकाखालील क्षेत्रामध्ये वाढ होत असली चांगला दर मिळत असला तरी उत्पादन व गुणवत्ता दर्जा याबाबत आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे. सध्या केवळ आखाती देशात केळी निर्यात होत आहे. जिल्ह्यातील

शेतकऱ्यांसमोर युरोपियन देशातील निर्यातीचे उद्दिष्ट ठेवून त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकऱ्याना के.डी.एक्सपोर्टच्या वतीने दरवर्षी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहेत. यावर्षी आरूण गाडे

(चांदज), कैलास लबडे (शेटफळ), हनुमंत पाटील (वांगी), आबासाहेब धडस (बिटरगाव) या शेतकऱ्याना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटक नॅचरल शुगर कळंब जि. धाराशिव चे चेअरमन बी. बी. ठोंबरे म्हणाले शेतकऱ्यांनी आता

आपल्या शेतातील पिकलेला शेतीमाल विकण्याबरोबरच बाजारात जे विकत असेल ते पिकवण्यावर आणि उत्पादित मालावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करण्यावर भर दिला पाहिजे. यासाठी करमाळा तालुक्यात केळी पिकासाठी मोठा वाव असून केळीच्या बुंध्यापासून सी.एन.जी. बायोगॅस तयार करण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. माझ्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे स्वागत केळी एक्सपोर्ट चे किरण डोके यांनी केले यावेळी बोलताना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख म्हणाले की, काळी कोरडवाहू ज्वारी पिकवणारा सोलापूर जिल्हा ज्वारीनंतर सूर्यफूल, बोर, डाळिंब, ऊस असा प्रवास करत सध्या केळीच्या उत्पादनात अग्रेसर ठरत असून तो कायम अग्रेसर राहण्यासाठी काही पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. माजी कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी किरण डोके या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाचा केळी उत्पादकापासून ते निर्यातदार होण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा असून इतर शेतकऱ्यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे. यावेळी पणन विभागाचे माजी संचालक सुनील पवार यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाणे, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांची भाषणे झाली. या कार्यक्रमाला विद्या विकास मंडळाचे विलासराव घुमरे, तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे, लोकविकास डेअरीचे चेअरमन दिपक देशमुख, केळी निर्यातदार दादासाहेब पाटील, दत्ता माळी, आदिनाथचे माजी उपाध्यक्ष नानासाहेब लोकरे, नवनाथ भांगे, सरपंच मौला मुलाणी, विकास वाघ, जैन इरिगेशनचे किरणं पाटील, उपसरपंच अमर भांगे, शिवशंकर माने, कैलास लबडे, पोपट अनपट, सोमनाथ हुलगे, अरूण पवार, संतोष नाळे, अनिल जगदाळे यांच्या बरोबर या परिसरातील शेतकरी व महीला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.