करमाळा प्रतिनिधी

तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नंबर 2 येथे शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक यांची संयुक्त सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शिक्षणासाठी पालकांचा जास्तीत जास्त सहभाग घेता यावा यासाठी खातगाव नं.2  शाळेमध्ये सातत्याने पाठपुरावा केला जातो.

      सध्या संपुर्ण महाराष्ट्रामध्ये “मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा” हा कार्यक्रम राबविला जात आहे. त्या अनुषंगाने खातगाव नं. 2 शाळेतही शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व पालकांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये

शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे यांनी या “मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ शाळा” या उपक्रमांतर्गत शाळांचे मूल्यांकन कोणकोणत्या निकषांच्या आधारे होणार आहे. शाळेमध्ये कोणकोणते उपक्रम राबविणे आवश्यक आहे. तसेच त्यामध्ये शाळा

व्यवस्थापन समितीची भूमिका कशी निर्णायक ठरणार आहे. शाळा स्तरावर 60 गुण तर शाळा व्यवस्थापन समितीने राबवायच्या उपक्रमांना 40 गुण याबाबत सविस्तर माहिती दिली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना होणाऱ्या अनमोल उपयोगाचा आणि एकूण शाळेच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकला.

        आम्ही शिक्षक जो ध्यास घेऊन या उपक्रमात सहभागी झालो आहोत त्याला आपण सर्व ग्रामस्थांनी आणि पदाधिकाऱ्यांनी खंबीरपणे साथ द्यावी असे आवाहन करत. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बोडखे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सभेसाठी खातगावचे सरपंच अविनाश मोरे, उपसरपंच विठ्ठल कोकरे, ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष झेंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक औदुंबर मोरे तसेच महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

   प्रमुख दळणवळणाच्या सोई पासून दुर्गम असूनही आणि छोटी शाळा असूनही शाळेत राबवत असलेल्या या उपक्रमाबद्दल करमाळ्याचे प्रभारी गटविकास अधिकारी देवीदास सारंगकर, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी सुग्रीव नीळ, जयवंत नलावडे तसेच जिंती केंद्राचे केंद्रप्रमुख महावीर गोरे आणि सर्व ग्रामस्थांनी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बोडखे आणि उपशिक्षक किरण जोगदंड यांचे कौतुक केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *