
करमाळा प्रतिनिधी
मांगी येथील अतिशय गरीब कुटुंबातील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील रोहिदास शिंदे, याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोग रँक 36 क्लास वन पदी निवड झालेले आहे. त्याच्या जिद्दीच्या आणि चिकाटीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

त्याचे वडील कालिदास शिंदे व आई लक्ष्मी शिंदे हे दोघे पण शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात लहानपणापासूनच रोहिदास हा शाळेत हुशार विद्यार्थी होता. त्याचं शाळेतील प्राविण्य पाहून वडील कालिदास शिंदे यांनी रोहिदास याला खूप शिकून मोठा

अधिकारी बनवायचं हे स्वप्न उरी बाळगून दिवस रात्र कष्ट करून रोहिदास याच्या उच्च शिक्षणासाठी पैसा जमवून त्याला पुणे येथे शिक्षणासाठी पाठवले. शिक्षण सुरू असतानाच एम.पी.एस.सी. चा अभ्यासक्रम त्याने सुरू केला व त्यातूनच त्याला

मोठे यश मिळाले व आज त्याची क्लास वन अधिकारी पदी निवड झालेले आहे. मांगी गावात त्याचे विशेष कौतुक केले जात असून. रोहिदास याच्या आई-वडिलांनी व मित्र परिवारांनी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला.

यानिमित्त माजी आमदार शामलताई बागल तसेच मांगि येथील सामाजिक कार्यकर्ते सुजीत तात्या बागल मित्र परिवारातर्फे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.