
करमाळा प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा व राज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंचायतराज चे गणेशजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा येथे भाजपा पंचायत राज महाविजय, माढा लोकसभा नियोजन व आढावा बैठक पश्चिम महाराष्ट्र चे अध्यक्ष निनाद पटवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

याप्रसंगी पंचायतराज चे जिल्हा उपाध्यक्ष अमरजित साळुंके यांनी प्रास्तविक केले व आजपर्यंतचा कार्याचा आढावा सादर केला. महाविजय च्या अनुषंगाने पटवर्धन व नितीन नागटिळक यांनी गाव पातळीवरील बूथ स्तरावरील नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.

बैठकीमध्ये पंचायत राजचे प्रदेशाध्यक्ष गणेश काका जगताप यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपा निवडणूक समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल विशेष अभिनंदनचा ठराव करण्यात आला.

या बैठकीसाठी भाजपा जिल्हा सचिव शाम सिंधी, पंचायतराज चे सोलापूर (प) जिल्हा अध्यक्ष नितीन नागटिळक, जिल्हा उपाध्यक्ष अमरजीत साळुंके, निता साखरे, तालुका अध्यक्ष रामराजे पाटील, माढा लोकसभा प्रमुख महेश शिंदे, सोलापूर लोकसभा प्रमुख साळे सर, विधानसभा प्रमुख समाधान कांबळे, ता.उपाध्यक्ष दत्तात्रय देशमुख, ज्ञानेश्र्वर खाटमोडे, किरण वाळूंजकर, प्रशांत कुलकर्णी, शिवाजी जाधव, विशाल पाटील यांचेसह पंचायतराज चे पदाधिकारी उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे आभार किरण वाळूंजकर यांनी मानले.



