
३६ विद्यार्थी संशोधकांसह विविध क्षेत्रांतील १५ समाजदीपांचा २३ ऑगस्टला गौरव…
करमाळा प्रतिनिधी
यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, पुणे यांच्या वतीने ‘पद्मश्री डॉ. अरविंद गुप्ता विज्ञान प्रेरणा पारितोषिक’ आणि ‘केतकी हिम्मतराव शिंदे समाजदीप पुरस्कार २०२६’ वितरण सोहळा रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता यशकल्याणी सेवाभवन, पुणे रोड, करमाळा येथे होणार आहे.
करमाळा तालुक्यातील विविध विज्ञान प्रदर्शनांमध्ये उल्लेखनीय व नावीन्यपूर्ण प्रयोग सादर करणाऱ्या ३६ विद्यार्थ्यांना ‘पद्मश्री डॉ. अरविंद गुप्ता विज्ञान प्रेरणा पारितोषिक’ देऊन गौरविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रयोगशीलता आणि संशोधनवृत्ती वाढीस लागावी, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे.
याच सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, विधी, उद्योग आणि महिला सक्षमीकरण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या १५ कर्तृत्ववान व्यक्तींना ‘केतकी हिम्मतराव शिंदे समाजदीप पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संपतराव (भारतभाऊ) शिंदे पाटील विश्वस्त श्री स्वामी समर्थ देवस्थान अक्कलकोट हे राहणार असून सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ व मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अरविंद देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल.
प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रचिती पुंडे, हिम्मतराव शिंदे आणि वीरमाता अनुजाताई अरविंद निलंगे उपस्थित राहणार आहेत.
याच सोहळ्यात सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि उल्लेखनीय कर्तृत्वाची दखल घेत डॉ. हेमा शिराळ होगाडे तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबई, ॲड. सविता शिंदे करमाळा, शारदाताई नटवरदास देवी करमाळा, हिरा केशवराव वीर करमाळा, मेघाली श्रीपाद शेटे-आडकर, डॉ. स्वाती दत्तू पाटील पी.एम.पी. कॉलेज करमाळा, डॉ. निशा चंद्रकांत सारंगकर करमाळा, चंद्रकलाताई मधुकर मारकड पाटील, संध्या गौतम शिंदे-थोरे, मनीषा दादासाहेब काळे, निशीगंधा अनिल शेंडे, प्रियांकाताई शरद जाधव, ॲड. मधुरा अलका भीष्माचार्य चांदणे करमाळा, प्रांजली बाळकृष्ण लावंड करमाळा आणि डॉ. सायुज्या प्रचिती अक्षय पुंडे पुणे यांना गौरविण्यात येणार आहे.
समाजाला दिशा देणाऱ्या कर्तृत्वाचा सन्मान आणि विद्यार्थ्यांच्या विज्ञाननिष्ठ जिज्ञासेला प्रेरणा देणारा हा सोहळा ‘विज्ञानातून विचार आणि सेवेतून परिवर्तन’ हा संदेश अधोरेखित करणारा ठरणार आहे.
कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष डॉ. गणेश करे-पाटील आणि D.E.L.T.A. सोलापूरचे अध्यक्ष प्रा. बाळकृष्ण लावंड यांनी केले आहे.