करमाळा प्रतिनिधी

आज इरा पब्लिक स्कूल, चिखलठाण येथे भव्य बाजार दिनाचे उदघाटन सरपंच धनश्री विकास गलांडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी जयवंत नलवडे, विकास गलांडे, पंचायत समितीचे माजी उपसभापती

दत्तात्रय सरडे, माजी जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, माजी सरपंच चंद्रकांत सरडे, उपसरंच आबा मारकड, सकाळचे पत्रकार गजेंद्र पोळ, पुढारी चे पत्रकार प्रशांत नाईकनवरे, संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष शंकर पोळ, अध्यक्ष डॉ. ब्रिजेश बारकुंड, सचिव सुनिल अवसरे व सर्व पालक उपस्थित होते.

या बाजारात भाजीपाला, फळे, स्टेशनरी,  खाऊगल्ली, गृहपयोगी वस्तूंचे विविध स्टॉल्स उपलब्ध होते. लहान बालगोपाळांचा हा आगळावेगळा बाजार पाहून उपस्थितांनी वाह वाह केली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आपल्या सामानांची विक्री केली.

विद्यार्थ्यांच्या चढा ओढी आवाजाने संपूर्ण बाजार दुमदुमला. आपल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी चढा ओढ लागली होती.

या बाजारात चिखलठाण 1 ,2 , कुगाव, टोपेबाबा, केडगाव, शेटफळ, जेऊर व परिसरातील लोकांनी गर्दी केली होती.

ग्रामीण भागात आदर्श व संस्कारक्षम विद्यार्थी घडवणारी व उपक्रमशील शाळा म्हणजे इरा पब्लिक स्कूल. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षणबरोबरच व्यवहार ज्ञान वाढावे. तसेच आपल्या शेतीमध्ये धान्य

विकण्याची कला विकसित झाली पाहिजे आणि मुलांचा आत्तापासूनच व्यवसायिक दृष्टिकोन वाढीस लागला पाहिजे या उद्दात्त हेतूने बाजार डे चे आयोजन करण्यात आलेले होते.

या बाजारात बालगोपाळांनी 147000/- हजारांची उलाढाल केली.

हा भव्य दिव्य बाजार यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक कसबे सर, सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, शिक्षकेतर कर्मचारी व ड्रायव्हर बंधू यांनी अविरत परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *