करमाळा प्रतिनिधी

देशात सर्वाधिक साखर कारखाने असलेला‌ जिल्हा म्हणून सोलापुर जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात जवळ ४८ साखर कारखाने आहेत, त्यापैकी करमाळ्यात ४ आहेत. दोन सरकारी व 2 खाजगी आहेत. करमाळ्यात दोन सहकारी का. त्याची परिस्थिती सर्व तालुका जवळून पहात आहे. सभासदाचे मालकीचे पांच हजार / दहा हजार शेअर्सचे पैसे भरून सभासदाच्या पदरात काय मिळते ? न ऊस वेळेवर जातो, त्याचे पैसे वेळेवर नाहीत, दिवाळी, पाडवा साखर नाही. ऊस जाण्यासाठी दारोदार भटकावे लागते, त्यात सभासदाचा काय दोष.

तालुक्यात पावसा अभावी दुष्काळी परिस्थिती, रिकामे होत असलेले उजनी धरण,  तालुक्याच्या पूर्व भागांत पाण्याने हाल. जुन-जुलै पर्यंत  पियाचे पाणीही मिळगे कठीण होईल. उस लागवड होणे कठीण. ऊस व साखर कारखान्यी परिस्थिती पाहून शेतकरी केळी व इतर पिकाकडे वळत आहे. नवीन लागवड कमी झाल्याने आगामी हंगामी कठीण आहे.

अदिनाथ कारखान्यात ऊस उत्पादकाचे पैसे FRP वेळेवर न देणे, काटा पेमेंट देतो म्हणून पैसे वेळेवर न देणे, उसतोड टोळीचे नियोजन पैसे अभावी न करणे, कर्मचारी पगार वेळेवर न देणें, ऊस वाहतुकदार पेमेंट अडकवणे, कारखान्यात लाईट, पाणी व्यवस्था अपूरी, इ. बऱ्याच कारखाने आर्थिक अडचणी व नियोजना अभावी कारखाण्याची अवस्था बिघडलेली आहे. कर्मचारी पगार वेळेवर करू शकत नाही तर विनाकारण गरज नसता नोकर भरती करण्याचे कारण काय ? कारखान्यातील भंगार विकून पैश्याची जुळवाजुळव करावी लागत आहे. सध्या कारखाना नुकसानित चालू ठेवण्याऐवजी वेळीच बंद करने योग्य राहिल.

अदिनाथ कारखाना किसी दिवस चालला ? साखर किती किंटल तयार आहे ? साखर काय करायची आहे? गव्हाणीतील उस किती दिवस वाळत आहे ? पगारांची व्यवस्था काय ? इ. गोष्टीचा विचार केला तर कारखाना जास्त नुकसानीत जात आहे. जबाबदार नेते मंडळीने त्यात लक्ष्य घालणे गरजेचे आहे. सर्वांने एकत्र येऊन मार्ग निघेल. सभासदाने गटतट, हेवेदावे न पहाता योग्य सकारात्मक विचाराने एकत्रयावे व निवडनुक ठेवण्याच्या दृष्टीने पावले टाकावीत, नुसत्या पहाटच्या अंधारात महादेवाला पाणी घातल्याने मार्ग निघेल असे वाटत नाही. अशी माहिती आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक डॉ. वसंत पुंडे यांनी दिली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *