
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरातील महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादनासाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महिला बचत गट आठवडी बाजार सुरू होणार असुन हा बाजार दि. २५/०८/२०२६ पासुन दर मंगळवारी श्री. खोलेश्वर मंदिरा समोर, मा. आमदार जयवंतराव नामदेवराव जगताप सामाजिक सभाग्रह, किल्ला वेस, करमाळा येथे सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजे पर्यंत भरणार आहे. या बाजारात मिळणाऱ्या उत्कृष्ट व दर्जेदार वस्तु, पदार्थ, हस्तकला वस्तु व सेंद्रिय भाजीपाला या

स्वस्त, दर्जेदार आणि घरगुती पद्धतीने तयार केलेल्या असतील. तरी करमाळा शहरातील सर्व नागरिकांनी या ठिकाणी भेट देऊन वस्तु खरेदीचा लाभ घ्यावा व महिला बचत गटांना सहकार्य करावे असे आवाहन करमाळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मोहिनीताई सावंत, उपनगराध्यक्ष अतुल फंड, सभापती महिला व बालकल्याण समिती निर्मला गायकवाड, मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी केले आहे.