माझी मामे बहीण डॉ. ज्योती राठोड पुणे आणि मनोज जगन्नाथ राडोड (Dean-JSPM University)पुणे यांची मुलगी आभा आता सीए फायनलमध्ये आहे. तिचा आज वाढदिवस होता. अगदी काळजातून वाटलं की, या युवतीवर लेख लिहावा. माझ्या मामाची नात आहे म्हणून नव्हे तर आज तिनं तरुण पिढी समोर प्रचंड ताकदीचा एक आदर्श उभा केला आहे. मी मात्र खरंच निशब्द झाले.

तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या या वयात खरंच मित्र मैत्रिणी सोबत पार्टी करायला तिला काहीही हरकत नव्हती. नववर्षाच्या पार्ट्यां/रेव्ह पार्ट्यांचे किस्से आपणाला नवे नाहीत. दंगा, मस्ती, केक कटिंग,केक तोंडाला लावणं.. असं बरंच काही आपण पहात आलो आहोत. हे सवयीचं झालं आहे. या आणि अशा गोष्टी मुळं अस्वस्थतेचं काहूर माजतं मनात.

खरंतर हे सगळं सांगून तुम्हाला मी थोडंसं प्रवाहाच्या विरुद्ध जाणा-या एका तरुणीची आभाची, डोंगरा एवढ्या विशालतेची गोष्ट सांगणार आहे. आपला वाढदिवस कसा साजरा करावा ? आणि तो अगदी अविस्मरणीय ठरावा म्हणून आभानं रक्तदान केलं. रक्तदान करण्याचं तिचं हे दुसरं वर्ष. आपल्या एका रक्ताच्या थेंबानं कोण्या जीवाचे प्राण वाचत असतील तर आई शप्पथ !  कसला हा सामाजिक विचार ! अशी तरुणाई अशी मुलं खरंच आपल्या देशात आहेत. गोष्ट कौतुकास्पद आहे. नक्कीच ! अस्सल संस्कारानं भरलेली अशी पीढी घराची, समाजाची आणि देशाची शान ठरतात हे नव्यानं सांगायला आवडेल. घरातून संस्काराची पेरणी आणि आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो ही भावना आज तरुणाई जपते आहे गोष्ट खरंच अनुकरणीय आहे.

आभा पुण्याची,शहरात वाढणारी मुलगी. पैशाची कमतरता नाही. पण वाढदिवस किती साधेपणानं साजरा केला. खरंतर इथं या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला मी साधं म्हणावं हे चुकतंय खरंच चुकतंय ! वाढदिवस साधा नव्हे तो रक्तदान करुन महान ठरला गेलाय ! वाढदिवसाच्या रात्रीतल्या रंगणाऱ्या आणि झिंगणा-या पार्ट्यांना कुठंतरी या महान विचाराने ‘थांबा’ मिळेल असा आशावाद मनात घोळून जातोय कैकदा !

आभा तुझ्या या विचाराला मला लेखाच्या माध्यमातून लांबवर पोहचवता आलं. कुणीतरी तुझा हा विचार उचलेल आणि असाच एक सामाजिक उपक्रम वाढदिवसाला राबवेल म्हणून एवढा खटाटोप केला.

बदलाच्या वाटेवर चालणा-या आभाला पुरस्कारा एवढ्याच मोलाची शाबासकीची एक थाप पाठीवर मला देता आली. मला खरंच आतून काळजातून छान वाटलं. ‘कोण म्हणतं तरुणाई वाया चालली ?’

पुन्हा एकदा तूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभा  !

………… अंजली राठोड-श्रीवास्तव, करमाळा        ७७०९४६४६५३

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *