६ जानेवारीला पंढरपूरात ओबीसी आरक्षण बचाव एल्गार महाकाय सभा होणार -शंकरराव लिंगे
जेआरडी माझा
गेल्या पाच महिन्यापासून मराठा समाजाचे जमिनदाराचे कोणबी करण करण्याचे षढयंत्र महाराष्ट्र सरकार शिंदे समितीच्या मार्फत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कृत्य करून ओबीसी समाजावर अन्याय करीत आहेत. ओबीसीच्या शैक्षणिक, नोकऱ्यातील खास करून स्थानिक स्वराज्य संस्थामधील राजकीय आरक्षण संपविण्याचा प्रयत्न चालू आहे. तो व ती शिंदे समिती बरखास्त करून त्याने दिलेले कुणबी दाखले धारकास शिक्षण, नोकरी राजकीय कोणताही लाभ देऊ नये. म्हणून शनिवार दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २.०० वाजता पंढरपूर रेल्वे स्टेशन रोड, टिळक मैदानावर ओबीसी आरक्षण बचाव महाकाय एल्गार सभा, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ओबीसी नेते ना. छगनरावजी भुजबळ साहेब, विरोधी पक्षनेते विजयजी वडट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली आमदार गोपीचंद पडळकर, माजीमंत्री महादेवजी जानकर, माजी आमदार प्रकाश शेंडग आण्णा, प्राध्यापक टी.पी. मुंढे, साहित्यीक लक्ष्मण गायकवाड, विदर्भाचे ओबीसी नेते बबनराव तायवडे, बारा बलुतेदार नेते कल्याणजी दळे इत्यादी मान्यवरांसह, लाखो सकल ओबीसी बंधू-भगिनींच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती ओबीसी नेते शंकरराव लिंग यांनी दिली. गेल्या पाच महिन्यापासून महाराष्ट्रात तथाकथित मराठा समाजाचा नेता नवनविका मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन ओबीसीत आरक्षण मिळावे म्हणून महाराष्ट्रभर प्रस्तापीत मराठ्यांचा साधन संपत्तीचा, राजकीय शक्तीचा वापर करून लाखोंचे मेळावे घेत आहेत. शंभर, शंभर जेसीपी मधून फुले उधळूण स्वागत समारंभ करीत आहेत. हेलीकॅप्टरच्या मार्फत सभेच्या ठिकाणी पुष्पवृष्टी करत आहेत. जाळपोळ करीत आहेत. बसगाड्या, कार, ओबीसींची दुकाने, हॉटेल, घरे, लोकप्रतिनिधींचे बंगले, पेट्रोल बॉब टाकून नष्ट करीत आहेत. जाळून टाकीत आहेत. मोडतोड करीत आहेत. माढा तालुक्यातील तुळशी ग्रांपंचायतचे ओबीसी पॅनल उभा करणाऱ्या हरी काशीद यांच्या घरावर हल्ला करून गोठा जाळणे, वैरण जाळणे, जनावराचा पायमोडल्याने दोन लाख रूपये नुकसान करून घरातील आई वडिलांना, भावाला मारहण केली. तारापूर नाला पंढरपूर तालुक्यात ओबीसी समाजातील अंपग मुलास झाडाला लटकून फाशी देण्यात आली आहे. फाशी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून अनेक तरूणांना संपवून आत्महत्येची संख्या वाढविली जात आहे. गावोगावी ओबीसींच्या कार्यकर्त्याच्या घरावर

हल्ला करीत आहेत. हॉस्पीटलवर दगडफेक करीत आहेत. हॉस्पीटलच्या मालकाचा पुतळा जाळत आहेत,

दमदाटी करून ग्रामपंचायत सरपंचाकडून ओबीसीच्या सरपंचाकडून मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून ठराव करून घेत आहेत. सर्व हातकंडे वापरून दहशत निर्माण करीत आहेत. पोलीसावर हल्ला करीत आहेत. महिला पोलिसाना जखमी करत आहेत. अवाच्य भाषेत आमदार, खासदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, सरकार यांना गावबंदी करत आहेत. सरकारला वेठीस धरून कोणत्याही परिस्थितीत सरसकट मराठा समाजास ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी भाग पाडत आहेत. अलांटमेंट देत आहेत. बघून घेणे, काटा काढणे, कार्यक्रम करणे अशा धमक्याही वारंवार देत आहेत. सभेच्या अगोदर अन् सभेमध्ये श्रीमंतीचे प्रदर्शन करून आरेरावीची बेकायदेशीर विधाने करून ओबीसी समाजामध्ये भितीचे वातावरण तयार केले आहे. ओबीसी समाजातील घटक धनगर, वंजारी, भटक्या विमुक्त यांचा गैरसमज करून ओबीसी नेत्यामध्ये अविसवासाचे वातावरण तयार करून ओबीसीचे आरक्षण लाटण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे. मराठा आरक्षणाबरोबर मुस्लीम आरक्षण, धनगर आरक्षण, अदिवासी, बारा बलुतेदार यांना मधाचे बोट दाखवून ओबीसी नेत्या विरुद्ध वातावरण तयार करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. म्हणून एल्गार समितीमार्फत आमची मागणी आहे. मराठा समाजाला आठ आयोगाने सामाजिक, शैक्षणिक मागासलेले पण सिद्ध होत नसल्याने त्यांना घटनेप्रमाणे ओबीसीमध्ये आरक्षण देता येत नाही असा रिपार्ट दिला आहे. राणे व गायकवाड आयोग हायकोर्ट, सुप्रिम कोर्टात रद्द झाला आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसी मधून कोणतेही आरक्षण देऊ नये. तो सप्रिम कोर्टाचा अपमान आहे. बेकायदेशीर शिंदे कमिटी त्वरित रद्द करा. त्यांनी दिलेले कुणबी दाखले रद्द करा. आजपर्यंत मराठा समाजाला २५ खासदार १६० च्या आरपास आमदार, डझनभर मुख्यमंत्री ६० टक्के मंत्री, ८० टक्के शाळा, कॉलेज, सहकारी संस्था, त्यांना सरकारने दिल्या आहेत नोकऱ्यामध्येही त्यांच्या संख्येपेक्षा जास्त कथिलिदित्व मिळाले आहे. म्हणून मराठा समजाप्रमाणे एसी, एसटी, ओबीसी यांचा सर्वच क्षेत्रातील बॅकलॉक भरून काढल्याशिवाय मराठा व इतर कोणत्याही प्रस्थापित समाजाला सरकारी व आरक्षणातील लाभ देऊ नयेत इत्यादी मागण्या करण्यात येणार आहेत. जातनिहाय जनगणना झाली पाहिजेमराठ्याची लोकसंख्या २८ टक्के आहे. त्यात १६ टक्के ओरीजनल कुणबी आहेत.८ टक्के डुप्लीकेट कुणबी आहेत. आरक्षणाच्या बाहेर फक्त ४ टक्केच मराठा आहे. म्हणून मराठा नेते लोकसंख्येची चुकीचे आकडे दाखवत आहेत. म्हणून जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे. जातनिहाय जनगणनेस विरोध करतील त्यांना आणि ओबीसीवर अन्याय करतील त्यांना सकल ओबीसी समाज त्यांना यापुढे मतदान करणार नाहीत असे मागणीचे ठराव करण्यात येणार आहेत. तरी सकल ओबीसी समाजाने आणि ओबीसी समाज समर्थाकांनी लाखोंच्या संख्येने ६ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ठिक २ वाजता स्टेशन रोड पंढरपूर येथे उपस्थित रहावे असे आवाहन सकल ओबीसी समाजामार्फत ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला शशी कांबळे मनीषाताई माने मनीषाताई वहिनी वाघमोडे दाजी डॉ माधुरी पवार परिवार ओबीसी नेते शंकरराव लिंगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *