करमाळा प्रतिनिधी

स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूल मध्ये 80 वा स्वातंत्र्यदिन अगदी उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शाळेचे संस्थापक/अध्यक्ष जयंत दळवी सर,  शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री दळवी मॅडम यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मुख्याध्यापिका धनश्री दळवी मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्र ध्वजाला सलामी देण्यात आली. राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत व ध्वजगीत तसेच राज्यगीत गायन करून अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.  विद्यार्थ्यांनी संगीतमय कवायत सादर करून सर्वांची मने जिंकली तसेच विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या नंतर काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. इयत्ता तिसरी, चौथी, पाचवीच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब प्रात्यक्षिक सादर केले. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षक लोंढे सर यांनी मार्गदर्शन केले. मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. अशाप्रकारे अतिशय प्रसन्न वातावरणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका शुभांगी खळदकर यांनी केले तर आभार शिवांगी कांबळे यांनी मानले. या प्रसंगी पालक ,सर्व शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *