करमाळा प्रतिनिधी

ग्रामपंचायत निंभोरे येथे 80 वा स्वातंत्र्य दिन खुप मोठ्या उत्साहात व विविध उपक्रम घेऊन साजरा करण्यात आला. सरपंच रविंद्र वळेकर यांनी स्वतः ध्वजारोहण करण्याऐवजी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी श्री छत्रपती संभाजी विद्यालय, निंभोरे येथील इयत्ता दहावीतील यशस्वी विदयार्थ्यांच्या हस्ते ग्रामपंचायत निंभोरेचे ध्वजारोहण केले. दहावीच्या बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक आलेली स्नेहा सचिन पवार, द्वितीय क्रमांक शिवराज भाऊसाहेब वळेकर, तृतीय क्रमांक आदित्य सचिन कांबळे या यशस्वी विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. तसेच या तिन्ही विद्यार्थ्यांना रेंजर सायकल व प्रमाणपत्र बक्षीस म्हणून देण्यात आले. या बक्षीसाचा सर्व खर्च निंभोरे गावचे सुपुत्र आणि सध्या पुणे येथील उद्योजक रामेश्वर मारकड व युवा सरपंच रविंद्र वळेकर यांनी मिळून केला.

तसेच माजी आमदार संजयमामा शिंदे व निंभोरे गावचे लोकनियुक्त सरपंच रविदादा वळेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या जनरल नॉलेज स्पर्धा व संगीत खुर्ची स्पर्धा यामधील यशस्वी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच स्कॉलरशिप परीक्षेत यशस्वी झालेले प्रणव वळेकर आणि शिवराज वळेकर यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ, पदाधिकारी, सरकारी अधिकारी व कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *