अहमदनगर प्रतिनिधी

राज्यातील नाभिक समाजाचा समावेश ‘ एस सी’ प्रवर्गात करण्याची मागणी गेले कित्तेक वर्ष सरकार दरबारी प्रलंबित आहे. आपल्या याच मागणीसाठी समाजाने आजवर सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही कोणत्याही शासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार केलेला नाही. परिणामी हक्काचे दावेदार असून आणि केंद्र सरकारने शिफारस करूनही राज्यभरातील तमाम नाभिक समाज या महत्वपूर्ण मागणीपासून वर्षानुवर्ष वंचित आहे.

मात्र अहमदनगर शहरातील नाभिक समाज आता आपल्या हक्काच्या मागणीसाठी आक्रमक झाला असून त्यांनी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने आज मंगळवार दिनांक १२ सप्टेंबर पासून आमरण उपोषनाचे हत्यार उपसले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या संतश्रेष्ठ सेना महाराजांच्या पुण्यतिथीच्या दरम्यान हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष शांताराम राऊत यांनी सांगितले.

या आमरण उपोषणात जिल्हा अध्यक्ष शांताराम राऊत यांच्यासह प्रदेश कार्य कारणी सदस्य विकास मदने, शिवाजीराव दळवी, कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश शिंदे सर, अजय कदम, अरुण वाघ आदी कार्यकर्ते उपोषणात बसणार असून महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांना विनंती करण्यात आली आहे की, हीच वेळ आहे सामाजिक ऐक्याची, समाजाच्या हक्कासाठी, मागण्यांसाठी आता सर्वांनी एकजुटीने रस्त्यावर उतरण्याची, आम्ही अहमदनगर शहरातून सुरुवात केलेली आहे, आपणही प्रत्त्येक ठिकाणी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसिलदार वै. स्थानिक प्रशासनास आपल्या हक्काच्या मागणीचे निवेदन देऊन या आरक्षणाच्या मुद्द्यास महाराष्ट्रभर निवेदनामार्फत जाहीर पाठिंबा द्यावा. असे जाहीर आवाहन समाजाला करण्यात आले आहे.

याच विनंती वजा अवाहणाची दखल राज्यभरातील नाभिक समाज घेत असून विविध संघटनांनी आपला थेट पाठींबा या आंदोलनाला जाहीर केला आहे.

सध्या तरी या उपोषणात अहमदनगर शहरातील महाराष्ट्र नाभिक महामंडळ, महाराष्ट्र अहमदनगर नाभिक समाज ट्रस्ट, तसेच अहमदनगर नाभिक सलून संघटना व सलून चालक मालक संघटना सहभागी झाल्या असून लवकरच जिल्ह्यातील विविध संघटना देखील सहभागी होणार असल्याचे अध्यक्ष राऊत यांनी यावेळी सांगितले. कुणीतरी सुरुवात करण्याची गरज होती ती सुरुवात नगर जिल्ह्यातील समाजाने केली आहे.

           प्रत्येक ठिकाणी निवेदन देण्याची जबाबदारी जिल्हाध्यक्ष अणि तालुकाध्यक्ष यानी दोन दिवसांत येतील तितक्या समाज बांधवाना सोबत घेऊन पुर्ण करावी, पुढील काळात जे नियोजन कळवले जाईल त्याची अंमलबजावणी सर्व समाज बांधवांनी करावी ही नम्र विनंती.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *