
जेआरडी माझा
सर्व एस् टी सेवानिवृत्त कर्मचारी मित्रहो, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळुन आज ७६ वर्ष पुर्ण होत आहेत. एस् टी महामंडळाच्या स्थापनेसही ७५ वर्ष पुर्ण झाली आहेत. तसेच ज्या सेवानिवृत्त कर्मचार्यांची वयाची ७५ वर्ष पुर्ण झाली आहेत

त्यांचा अमृत महोत्सवी यथोचित सत्कार व पारनेर आगारातील सर्वच निवृत्त कर्मचारी एकत्र यावेत त्यांच्या एकमेकांशी गाठी भेटी व्हाव्यात असा उदात्त हेतु डोळ्यापुढे ठेऊन पारनेर आगारातुनच सेवानिवृत्त झालेले सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे

जिल्हाध्यक्ष बलभिमजी कुबडे, आयुबशेठ शेख, एम्. के. उर्फ मच्छिंद्र शिंदे व माधवराव गाडीलकर साहेब यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन हा स्नेहमेळावा, सत्कार समारंभ व स्नेह भोजनाचा सुंदर कार्यक्रम अयोजित केला. तो खरोखरच

गौरवास्पद व एक स्तुत्य उपक्रम होता असे म्हणण्यास काहीच हरकत नाही. एस् टी महामंडळाच्या सेवेत असताना कित्येक वर्ष एकत्र ड्युटी केलेले जिवाभावाचे मित्र पण सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांची साधी गाठ भेट सुद्धा न झालेले कित्येक मित्र

आज या निमित्ताने एकत्र जमले, गाठी भेटी झाल्या, एकमेकांची प्रेमाने विचारपुस केली व गप्पा टप्पा झाल्या याचा आनंद सर्वच सुरकुत्या पडलेल्या वयस्करांच्या चेहर्यावर गुलाबाचे फुल उमलल्या सारखा ओसंडून वाहत असल्याचे स्पष्ट जाणवले

व याचे खरे श्रेय वरील चार मान्यवरांना जाते. ज्या सेवानिवृत्तांची वयाची ७५ वर्ष पुर्ण झाली त्यांचा शाल, श्रिफळ व गुलाबपुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. वयाची अर्धी अधिक वर्ष एस् टी च्या सेवेत खर्च केली त्या प्रमाणिक व निस्वार्थी सेवेची पावती म्हणुन हा सत्कार होता हे सर्वांनी मान्य केले पाहिजे. सत्कार समारंभ व मान्यवरांची मनोगते व्यक्त झाल्यानंतर सर्व उपस्थितांचे आभार मानले. तदनंतर आयोजकांच्या वतीने सर्वांनीच स्वादिष्ट व गोड स्नेहभोजनाचा आनंद घेतला. सर्व उपस्थितांच्या वतीने कार्यक्रमाच्या आयोजकांचे हार्दिक अभिनंदन व धन्यवाद ! तसेच या सर्व कार्यक्रमाचा खर्च व अन्नदानाचे पुण्य ज्यांनी घेतले त्या सर्वांचे पांडुरंग परमात्मा कल्याण करो. त्यांना दिर्घायुष्य लाभो अशी ईश्वराकडे प्रार्थना करुन त्यांना सदिच्छा देऊया. कवि – एकनाथ औटी (निवृत्त एस् टी वाहक, वडझिरे, ता. पारनेर) मो. ९८८१५३०५०६