पंढरपूर प्रतिनिधी

बॅण्ड,बॅन्जो कलाकारांच्या हक्क व मागण्यांसाठी कार्यरत असणा-या बॅण्ड व बॅन्जो चालक व कलाकार संघटना, महाराष्ट्र या संघटनेची विशेष बैठक पंढरपूर येथील कृष्णा मंगल कार्यालय येथे संपन्न झाली. यामध्ये सोलापूर जिल्ह्याची कार्यकारिणी निवडण्यात आली.

यामध्ये करमाळ्याचे सुनील शिंदे यांची जिल्हा खजिनदार तर दोस्ती बॅन्जो चे नासीरभाई यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी तर प्रफुल्ल दामोदरे यांच जिल्हा सहसचिव पदि नियुक्ती करण्यात आली.

या बैठकीस सातारा, फलटण, माण, बार्शी, सांगोला, वैराग, माळशिरस, पंढरपूर, सोलापूर, इ. भागांतून कलाकार व चालक उपस्थित होते.

या व्यवसायात येणा-या अडी अडचणींना संघटितपणे तोंड देण्यासाठी हि संघटना कार्य करत आहे असे प्रतिपादन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. अशोक जाधव सर यांनी या वेळी केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *