करमाळा प्रतिनिधी

नाभिक समाजाचे अध्यात्मिक महत्त्व सांगणारा नाभिक पुराण या ग्रंथानुसार नागपंचमीच्या दिवशी नाभिक समाजातील व्यक्ती हे आपला परंपरागत असलेला दाढी कटिंग चा व्यवसाय करत नाहीत ते का करत नाही? नागपंचमी नवीन पिढीला माहिती व्हावी. याबद्दल माहिती आहे.

नाभिक पुराण या ग्रंथानुसार नाभिकाची उत्पत्ती ही भगवान शंकराच्या गळ्यातील शेषाने (नागाने) नाभीतून जन्म घेतला व लोकांना शुद्ध करण्यासाठी शिखा (शेंडी) ठेवण्याचं कार्य त्यांच्याकडे दिले. त्यामुळे नाभिक समाज नागदेवतेला आपले वंशज मानतात. स्वतःला नागवंशी मानतात. व नागदेवतेला आपले पूर्वज मानतात.

पृथ्वीवर नागदेवतेने (नाभिक) नागपंचमीला जन्म घेतला. त्यादिवशी नाभिक समाज मोठ्या भक्ती भावाने नागदेवतेची पूजा करतात. आनंद साजरा करतात. विवाहित महिला नागदेवतेला आपला भाऊ मानतात तर शेतकरी नागाला आपला मित्र मानतात. प्रथम नागाच्या उत्पत्तीचा दिवस म्हणजे नागपंचमी होय.

नाभिक पुराण ग्रंथातील कथेनुसार नाभिका चा जन्म हा भगवान शंकराच्या नाभीतून झाला. जेव्हा पृथ्वीवर जलप्रलय झाला तेव्हा शंकराने तिसरा डोळा उघडून तो जलप्रलय थांबवला. या पृथ्वीवर नद्या, पर्वतांची निर्मिती केली. आकाशात सूर्य, चंद्र, तारे, नक्षत्र यांची निर्मिती केली शंकराच्या आशीर्वादाने विष्णूच्या नाभीतून ब्राह्मणाची निर्मिती केली. तो चतुर्मुख होता.

त्या ब्राह्मणाला भगवान शंकराने सृष्टीची निर्मितीचे काम सोपवले. तेव्हा विष्णू ने शंकराला सांगितले की ब्राह्मणांचे मूजबंधन कोण करणार? कारण मुजबंधन केल्याशिवाय ब्राह्मणाला ब्राह्मणत्व प्राप्त होणार नाही. ब्राह्मणाची शिखा कोणी कापावी? शिखाची निर्मिती करण्यासाठी नाभिकाची आवश्यकता आहे. तेव्हा भगवान शंकराने आपल्या गळ्यातील शेषनागाला स्वतःच्या नाभिकमलातून जन्म घेण्यास सांगितले. तो दिवस म्हणजे नागपंचमी होय.

भगवान शंकराच्या गळ्यातील शेषाने नागपंचमीच्या दिवशी पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर विचारले की मला कशाची प्राप्ती होईल तेव्हा भगवान शंकर म्हणाले तुला सर्व कार्यातमान सन्मान मिळेल. तुझ्याशिवाय ब्राह्मणाला ब्राह्मणत्व प्राप्त होणार नाही. सर्व स्त्रिया तुला भाऊ मानतील. नागपंचमीला सर्वजण तुझी मनोभावे पूजा करतील तुझ्या वंशात घेतलेल्यांना सर्वजण मान देतील.

हे सर्व ऐकून भगवान शंकराच्या गळ्यातील शेषाने विष्णूच्या नाभिकमलातून मनुष्य रूपाने जन्म घेतला. शंकराच्या नाभीतून जन्म घेतल्यामुळे त्याला नाभिक म्हणतात.

भगवान शंकराच्या गळ्यातील शेषाने विष्णूच्या नाभी कमलातून जन्म घेतल्यानंतर त्याला शिखा ठेवण्याचे काम मिळाले. त्याचे वंशज पूर्वी केस काढण्यासाठी चिमट्याचा वापर करत असत. पुढं नाभिकाचे चिमटेश्वर हे नाव पडले. तेव्हापासून नाभिक समाज नागपंचमीस आपला केस कापण्याचा परंपरागत व्यवसाय नागपंचमीला करत नाहीत.

नाभिक पुरानात आणि इतरही ग्रंथात नाभिक समाजाची उत्पत्ती व नागपंचमीचे महत्व याविषयी माहिती दिलेली आहे. नाभिक पुराण कथेनुसार नाभिकाची उत्पत्ती शंकराच्या नाभीतून झाली अशी कथा आहे.

पृथ्वीवर जलप्रलय झाला तेव्हा शंकराने तिसरा डोळा उघडून तो थांबवला. पृथ्वीवर समुद्र, पर्वत व नद्यांची निर्मिती केली तर आकाशात सूर्य, चंद्र, तारे आणि नक्षत्रांची स्थापना केली. शंकराच्या कृपेने विष्णूच्या नाभीतून ब्राह्मणाची उत्पत्ती झाली. तो चतुर्मुख होता.

त्या ब्राह्मणाला शंकराने सृष्टीची निर्मिती करण्यास सांगितले. तेव्हा विष्णू ने शंकराला सांगितले की ब्राह्मणाचे मुंज बंधन झाल्याशिवाय त्यास ब्राह्मणत्व प्राप्त होणार नाही. मुंजसाठी जानवे व शिखाची गरज होती. शिखाचे काम कोणी करावे, हा प्रश्न निर्माण झाला.

शिखा प्राप्त होण्यासाठी नाभिकाची निर्मिती आवश्यक होती. तेव्हा भगवान शंकराने आपल्या कंठातील शेषाला स्वतःच्या नाभिकमलातून जन्म घेण्यास सांगितले. तेव्हा शेषाने भगवान शंकराला विचारले की जन्मानंतर मला कशाची प्राप्ती होईल? शंकर उत्तरले तुला सर्व कामात मोठा मान प्राप्त होईल. तुझ्याशिवाय ब्राह्मणाला ब्राह्मणत्व प्राप्त होणार नाही.

सर्वांचा आवडता होशील व श्रावण महिन्यातील नागपंचमीस तुझे पूजन केले जाईल. स्त्रियांचा तो भाऊ होशील. तुझ्या वंशात उत्पन्न झालेल्या सर्वांना मान देतील. ही सर्व कथा ऐकून शेषाने शंकराच्या नाभीतून मनुष्य रूपाने जन्म घेतला.

शंकराच्या नाभीतून जन्म घेतल्यामुळे तो शेषनाग झाला नाभिक म्हणजे शेषनाग झाला. शेषनागाचा वंशज आहे. तेव्हापासून नागपंचमी दिवशी शेषनागाचे वंशज म्हणून नाभिक समाज बांधव आपले व्यवसाय नागपंचमी बंद ठेवतात.

नागपंचमीचा संबंध नाग या सरपटणाऱ्या सापाची नसून भारतात नाग हे तोटेम असणारे पाच पराक्रमी नागवंशीय राजे होऊन गेलेत. ते नागराजा अनंत (शेष), नागराजा वासुकी, नागराजा तक्षक, नागराजा कर्कोटक, नागराजा ऐरावत असे पाच राजे होते. यामध्ये नागराजा अनंत हा सर्वात मोठा जम्मू काश्मीरमधील अनंत नाग हे शहर त्यांच्या स्मृतीची साक्ष पटवून देते. त्यानंतर दुसरा नागराजा वासुकी नागराजा हा कैलास मानसरोपासून उत्तर प्रदेश क्षेत्राचा प्रमुख होता. तिसरा नागराजा तक्षक यानेच जगप्रसिद्ध तक्षशिला विश्व विद्यापीठ स्थापन केले. येथेच पुढे प्लेटो अॅरिस्टॉटल सारखे तत्त्वज्ञ शिकून गेलेत. चौथा नागराजा कर्कोटकाचे रावी नदीच्या शेजारील प्रदेशात राज्य होते. पाचवा नागराजा ऐरावत (पिंगाला) भंडारात प्रांत आजही पिगालाही एरिया म्हणून ओळखला जातो. हा पाच ही नागराजांच्या गणराज्याच्या सीमा एकमेकांच्या राज्याला लागून होत्या. पाच नागराजे मृत्यू पावल्यानंतर त्यांच्या जन्म स्मृती प्रित्यर्थ नागवंशीय लोकांनी नागपंचमी दिन दरवर्षी साजरा करीत असत.

कालांतराने वैदिक ब्राह्मणी यज्ञ वंशियांच्या लेखणीने नागराजाचे रूपांतर जमिनीवर सरपटणाऱ्या सापात करून टाकले. त्याचाच परिणाम म्हणून नाग नरसोबा आणि काही पोथ्या प्रसिद्ध झाल्या आणि हा दिवस फक्त सरपटणाऱ्या सापांची पंचमी म्हणून ओळखली जाऊ लागली आणि वास्तविक नागवंशीय राजे लोकांची पंचमी लुप्त झाली. दूध पाजणे, त्याची पूजा करणे एवढाच नागपंचमीचा अर्थ उरला. बहुजन समाज आजही घराच्या भिंतीवर पाच नाक काढणे विसरलेला नाही. हे पाच नाग म्हणजे आपले पाच नागराजे होते. ते जमिनीवर सरपटणारे सर्प नव्हेत. आज जरी नागपंचमी सरपटणाऱ्या नागाची म्हणून प्रसिद्ध असली तरी त्याबाबतची ऐतिहासिक वास्तविकता वेगळीच आहे.

वरील माहिती सुधीर भाऊ गाडेकर यांनी दिलेली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *