
करमाळा प्रतिनिधी
जेऊर ता.करमाळा येथील ग्रामदैवत श्री म्हाळसाकांत मंदीरा समोरील पोलीस स्टेशन परिसरातील दर्शनी भागात शिवस्मारक उभारले जाणार असुन या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी करण्यात येणार आहे. करमाळा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते शिवस्मारक जागेवर भुमीपूजन करण्यात आले आहे. जेऊर ता.करमाळा हे करमाळा तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठी लोकवसाहत असलेले शहर असुन या ठिकाणी आसपासच्या वीस हुन अधिक गावातील नागरिक विविध कामांसाठी येत

असतात. यामुळे जेऊर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी करण्यात यावी असा संकल्प आमदार नारायण आबा पाटील यांच्या मनामध्ये आल्यानंतर त्यास मुहुर्त स्वरूप देण्यात आले. जेऊर आणि परिसरातील नागरिकांसाठी तसेच माता भगिनी व खास करुन युवकांसाठी हे शिवस्मारक एक प्रेरणास्थान ठरणार आहे. शासनाच्या नियमावलीचे पालन करुन आवश्यक त्या सर्व विभागांच्या रितसर परवान्यासह येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. सदर पुतळा उभारणी व शिवस्मारक कामाची जबाबदारी जेऊर ता.करमाळा येथील सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या वर सोपविण्यात आली असुन शिवस्मारक निर्माण कृती समितीचीही स्थापना करण्यात आल्याचे सांगण्यात

आले. आमदार नारायण आबा पाटील यांच्या संकल्पनेतून जेऊर येथे उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. आमदार नारायण आबा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जेऊरचे माजी सरपंच भास्कर कांडेकर, माजी सभापती अतुल पाटील, पंचायत समिती सदस्य धनंजय शिरस्कर, माजी सरपंच सुलेमान मुल्ला, कर्मयोगी गोविंद बापु पाटील पतसंस्थेचे चेअरमन संजयकुमार गादीया, जि.प सदस्य गोडसे, आदिनाथ संचालक आबासाहेब अंबारे, रविकिरण फुके, माजी उपसरपंच राजाभाऊ जगताप, माजी ग्रामपंचायत सदस्य

हंबीरराव चव्हाण, विद्यमान सरपंच पृथ्वीराज पाटील, उपसरपंच नागेश झांजुर्णे, सदस्य उमेश निर्मळ, उमेश मोहिते, उमेश कांडेकर, सागर भगत, इकबाल पठाण, राकेश गरड, संदीप कोठारी, सुयोग दोशी, नवीन दोशी, मुबारक शेख, संतोष वाघमोडे, विनोद गरड,धनंजय घोरपडे, रामभाऊ जगताप, सूनील तळेकर यांचेसह जेऊर मधील प्रतिष्ठीत नागरिक व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
