करमाळा प्रतिनिधी

करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर च्या वतीने ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या अभियानांतर्गत माजी सैनिक व स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या

अध्यक्षस्थानी विलासराव घुमरे सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून करमाळा तालुका माजी सैनिक कल्याण अधिकारी संघटनेचे अध्यक्ष अक्रूर शिंदे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, उपप्राचार्य

कॅप्टन संभाजी किर्दाक हे होते. यावेळी विलासराव घुमरे सर यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना देशसेवा हीच ईश्वरसेवा असे गोरोद्गार काढले. तसेच याप्रसंगी महाविद्यालयातून एन.सी.सी.च्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आर्मी,

नेव्ही, पोलीस इ. क्षेत्रांमध्ये भरती होऊन देशसेवा करीत असल्याचे सांगितले. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अनेक स्वयंसेवकांकडून उत्तम समाजसेवा व देशसेवा घडत असल्याचे सांगितले तसेच माजी सैनिक कल्याण अधिकारी

संघटनेचे अध्यक्ष अक्रूर शिंदे यांनी त्यांच्या कारकिर्दीतील व कारगिल युद्धातील अनुभव कथन केले. विद्यार्थ्यांनी शिस्त, चिकाटी, संयम अंगी बाळगावा असेही आव्हान केले. तसेच या कार्यक्रम प्रसंगी मेजर जगदीश कदम यांनी विद्यार्थ्यांनी आर्मी

भरतीसाठी प्रयत्न करावेत व सैनिकी जीवनातून मानवी जीवनाचा उत्कर्ष होतो हे त्यांनी आपल्या स्वानुभवातून सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वतःचे ध्येय आणि उद्दिष्ट ठरवले पाहिजे तसेच धाडसी जीवन जगण्याचे आव्हान केले. मेजर अनिल साखरे यांनी आपल्या मनोगतातून अग्निवीर भरती प्रक्रियेतील समज – गैरसमज स्पष्ट करून सांगितले. तसेच मेजर शिंदे, मेजर कदम यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी करमाळा तालुका माजी सैनिक कल्याण अधिकारी संघटनेचे उपाध्यक्ष मेजर रवींद्र सवासे, स्वातंत्र्यसेनानी चिवटे आप्पा, मेजर पवार, मेजर सुरेश आदलिंग, मेजर किरण ढेरे, मेजर सुनील दौंडे, मेजर मारुती बनसोडे, मेजर लोकरे, मेजर नारायण खंडागळे, मेजर महादेव तोबरे, मेजर हनुमंत काळे, मेजर अरुण काशीद, शहीद जवान मच्छिंद्र वारे यांच्या पत्नी वारे ताई उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा.लक्ष्मण राख यांनी केले सूत्रसंचालन सुजाता भोरे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. हरिदास बोडके यांनी मानले. या कार्यक्रमासाठी यशवंत परिवारातील सर्व सदस्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डी. एस. जाधव, प्रा. जयंत भांगे, गणेश वळेकर, नवनाथ बिनवडे यांनी परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *