हे काय नवीन ? शीर्षक वाचून आचंबित झालात न ? खरच सांगते आमची टोळी (बहिणींची) खूप वेगळी व प्रेमळ आहे. प्रसंग आहे Get together चा. यावर्षी माझ्याकडे करमाळ्यात आमच्या टोळीचे Get together झाले. आम्ही एकूण 8 आठ मावस, मामे व सख्या बहीणी या टोळीत आहोत. दोन दिवस सर्वजण एकत्र घालवतो. खूप मज्जा करतो. Games खेळतो, Reels बनवतो, भरपूर गप्पा रात्रभर जागून मारतो. खाण मौज मज्जा दोन दिवस नुसती धमाल असते. या शिवाय एकमेकांचे सुख दुख पण शेयर करतो. या टोळीत प्रत्येक जणींची एक स्वतंत्र Identity आहे. कोणी डॉक्टर, कोणी उद्योजिका, कोणी

आध्यात्मिक, कोणी उत्तम गृहिणी आहे. विशेष म्हणजे आम्ही सर्व जणी 60 वर्षां पुढील आहोत. सर्वात लहान बहीण 50 वर्षांची आहे पण या दोन दिवसात आम्ही आमचे वय विसरतो व अगदी लहान मुलींसारखे जगतो अगदी आपल्या बालपणा सारखे तणाव विरहित. यावेळी आपण कोणाची बायको, कोणाची आई, कोणाची आज्जी आहोत हे आम्ही विसरून जातो व निखळ मैत्रिणींप्रमाणे दोन दिवस हसत खेळत घालवतो. या टोळीतील प्रत्येक जण वर्ष संपण्याची व पुन्हा भेटण्याची आतुरतेने वाट बघतो. या टोळीतील बहिणी लांब लांब राहतात. हैद्राबाद, देगलूर, USA, यवतमाळ, सगरोळी, छ. संभाजी नगर, मुंबई व मी करमाळा.

आपलं करमाळा सर्वांना खूप आवडलं मुख्य करून श्री कमला देवीचे मंदिर. तसेच चिवटे हॉटेल मधले सुग्रास खास खव्याच्या पोळीचे जेवण सर्वांना खूप आवडले. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तणाव घालवण्यासाठी, आपुलकी साठी, एकटेपणा घालवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना अशा Get togethers ची नितांत गरज आहे – मा. मुख्याध्यापिका निलिमा अनिल पुंडे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *