करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहर व ग्रामीण भागात ईद-उल-अजहा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी करमाळा शहरातील ऐतिहासिक ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली. तसेच नमाज पठण मौलाना मुश्ताक काझी आणि खुतबा पठण करमाळा शहर काझी मुजाहिद खलील काझी यांनी केले. ही परंपरा एक शतका पेक्षा जास्त काळा पासुन काझी घराणं करत आहे व ह्याचे सरकारी पेठा खातेत पुरावे व नोंद आहे.

करमाळा शहर काझी यांनी हजरत इब्राहिम अलैहीसलाम आणि हजरत ईस्माईल अलैहीसलाम यांनी इस्लामसाठी दिलेल्या कुर्बानी महत्व पटवून दिले. प्रेम, निस्वार्थीपणा आणि त्यागाची शिकवण देणारा ईद-उल-अजहा सण आहे.

काही राजकारण्यांकडून व काही न्युज चॅनेल समाजामध्ये द्वेष पसरवत असून आहे. हे सर्वसामान्य जनतेन समजून घ्यावे, तसेच पोलीस प्रशासनाने सतर्क राहून समाज मध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी असे शहर काझी यांनी मागणी केली. आपल्या भारतीय जवानाची कुर्बानी देश कधीच विसरणार नाही.

केंद्र सरकार व राज्य सरकार ने मॉब लींचीग लवकरच कायदा आणला पाहीजे कारण या मध्ये शंभरहून अधीक लोक मरण पावली आहे असे शहर काझी यांनी मागणी केली.

करमाळा शहर व सर्व ग्रामीण भागात ईद-उल-अजहा उत्साहात साजरी झाली.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *