
करमाळा प्रतिनिधी
वि.का.सेवा सोसायटी झरे ध्वजारोहन मेजर सुभाष मारुती कुर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. झरे गावचे विकास नारायण आमृळे यांनी मेजरबदल माहिती दिली असता त्यांचा सहभाग १९९९ कारगिल युद्धामध्ये होता व ध्वजारोहन अश्या व्यक्तीच्या हस्ते होणे म्हणजे झरे गावातील नागरिकांसाठी अभिमानास्पद आहे.

नामदेवराव जगताप माध्यमिक शाळा व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी झेंड्याला सलामी देत मार्च पास केले. विद्यार्थ्यांनी सुंदर देशभक्तीपर प्रतिज्ञा सादर केल्या. या कार्यक्रम प्रसंगी वि.का.सेवा सोसायटी चेअरमन व ग्रामपंचायत

सदस्या लक्ष्मी नारायणशेठ आमृळे, व्हा. चेअरमन मारुती अर्जुन गायकवाड, सोसायटी सदस्य कमल बाळासाहेब कांबळे, अशोक गुंजाळ, अकबर मुलाणी, दादा घाडगे, भानुदास बोराटे, पांडुरंग मावलकर, राजेंद्र मावलकर, कल्याण कोठावळे, महादेव

काळे, दत्तु चौधरी, अशोक सरोदे, झरे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत चौधरी, राधाबाई भानुदास बोराटे, सोनाली प्रकाश कोकाटे, तंटामुक्ती अध्यक्ष, आजी-माजी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व झरे ग्रामस्थ ही मोठ्या संख्येने उपस्थित होता. एकंदरीत कार्यक्रम प्रसंगी उत्साहाचे वातावरण तयार झाले होते.

