करमाळा प्रतिनिधी

प्रसिद्ध गायक प्रवीणकुमार अवचर यांना पुणे येथील लायन्स क्लब इंटरनॅशनल या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट गायक व संगीत दिग्दर्शक पुरस्कार मिळाल्याबद्दल नागेश (दादा) कांबळे पश्चिम महाराष्ट्र संघटक (RPI आठवले) यांच्या हस्ते सत्कार

करण्यात आला. यावेळी क. न. प. माजी नगराध्यक्ष दीपकरावजी ओहोळ, पोलीस पाटील संघटनेचे संदीप शिंदे पाटील, प्रसेनजीत कांबळे, युवा जिल्हाध्यक्ष यशपाल कांबळे, मातंग एकता आंदोलन चे शरद पवार, नामदेव वाघमारे, दत्ता बडेकर,

सुहास ओहोळ, विशाल भोसले, श्रीराम ओहोळ यांच्यासह सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया– गायनासह संगीत दिग्दर्शन क्षेत्रात प्रवीण अवचर गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असून त्यांना मिळालेल्या या

सर्वोच्च पुरस्कारांन नक्कीच करमाळा तालुक्याची मान उंचावलेली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस दीपक ओहोळ. माजी नगराध्यक्ष यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *