
करमाळा प्रतिनिधी
दि. भैरवनाथ प्रतिष्ठान संचलित जयप्रकाश बिले पब्लिक स्कूल झरे मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश बिले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच सचिव युवराज बिले, संचालिका डॉक्टर स्वाती बिले हे उपस्थित होते.

हा कार्यक्रम सकाळी ठीक 8 वाजता सुरू झाला. सर्वप्रथम ध्वजारोहण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जयप्रकाश बिले सर यांनी केले. नंतर राष्ट्रगीत व ध्वजगीत झाले. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून सांस्कृतिक कार्यक्रम लेझीम घेण्यात आले. लेझीम

साठी हलगी तानाजी हरणावळ यांनी वाजवली व कवायत घेतली. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे मुलांचे देशभक्तीपर भाषणे व सर्व मुले रंगीबेरंगी कपड्यांमध्ये खूप उठून दिसत होती. काही मुलांनी भगतसिंग, राजगुरू, महात्मा गांधी, झाशीची

राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. कार्यक्रमाचा शेवट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश बिले यांच्या भाषणाने झाला. त्यांचं भाषण सर्वांना स्फूर्तीदायक ठरले. त्यानंतर मुलांना गोड खाऊ देऊन कार्यक्रम समाप्त झाला. हा

कार्यक्रम पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक दादासाहेब खराडे व इतर शिक्षकांनी खूप मेहनत घेतली व आनंदाने स्वातंत्र्य दिन साजरा केला.
