
करमाळा प्रतिनिधी
शेतमाल बाजारात विकण्यापेक्षा प्रक्रिया करून त्याची विक्री केल्यास जादा फायदा होत असल्याने शेतकऱ्यांना भरघोस अनुदान मिळणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन

तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी शेटफळ ता. करमाळा येथे कृषी प्रक्रिया जागृती पंधवड्यानिमीत्त शेटफळ येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. कृषी विभागाच्या वतीने शेटफळ परिसरातील कृषी प्रक्रिया उद्योग करण्यासाठी इच्छुक

असणाऱ्या शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये बोलताना कृषी अधिकारी वाकडे यांनी शेतमालावर प्रक्रिया केलेल्या छोट्या उद्योगातून रोजगार निर्मिती बरोबरच शेतमालाचे मूल्यवर्धन होत असल्याने शेतकऱ्यांसाठी ते

फायदेशीर ठरत आहे तालुक्यातील विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी आपले छोटे उद्योग सुरू केले आहेत त्यांना चांगली बाजारपेठ ही मिळत आहे या मालासाठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. यामुळे जास्तीत जास्त

शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृषी सहाय्यक सुप्रिया शेलार यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. यावेळी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना मनोज बोबडे जिल्हा संसाधन

व्यक्ती, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना या मध्ये ज्वारी, बाजरी, मका, गहू, नाचणी वरई प्रक्रिया, मसाले प्रक्रिया, दूध प्रक्रिया, डाळ मिल, बेसन व्यवसाय, पापड उद्योग, शेवया उद्योग, तेलघाना पशुखाद्य, आंबा व सर्व फळे प्रक्रिया, गुळ व्यवसाय महाराष्ट्र शासन कृषी विभागाची ३५ टक्केअनुदानाचा लाभ घ्यावा. यांनी विविध प्रकारच्या प्रक्रिया उद्योग या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी करमाळा तालुक्यातील आत्तापर्यंत झालेले प्रकिया उद्योगाची माहिती दिली व या योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. अंतर्गत केले जाऊ शकतात व त्यासाठी कर्ज अनुदान व लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती देऊन उपस्थित इच्छुक शेतकऱ्यांचे यासाठी प्रस्ताव तयार केले. यावेळी यशस्वी कृषि प्रक्रिया उद्योग करणाऱ्या महिला उद्योजका मंदाकिनी चव्हाण व मनिषा बोराडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजेंद्र पोळ यांनी केले तर आभार प्रशांत नाईकनवरे यांनी मानले या कार्यक्रमाला कृषी पर्यवेक्षक मधुकर मारकड, कृषी लोकविकास फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष वैभव पोळ, संचालक नानासाहेब साळुंके, विलास लबडे, कैलास लबडे अशोक लबडे, समाधान गुंड, रणजीत लबडे, शिवाजी वाघमारे, सुहास पोळ, रोहित लबडे, विजय लबडे, महावीर निंबाळकर, सुंदरदास पोळ, प्रमोद पोळ, कृषी सहाय्यक रोहिणी सरडे, जिजामाता महिला शेतकरी गटाच्या अध्यक्षा हर्षाली नाईकनवरे, रेणूका लगड, समर्थ बचत गटाच्या अध्यक्षा शोभा गुंड, नागनाथ गटाच्या सुशीला गुंड, जगदंबा गटाच्या, जयश्री शिंदे, मातोश्री गटाच्या अश्विनी पोळ, पंचशील गटाच्या नगीना पोळ, कृष्णाई गटाच्या शकुंतला लबडे, गणेशा गटाच्या निर्मला लगड, आश्विनी पोळ व गावातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.