करमाळा प्रतिनिधी

मेघा कांबळे, साधना काळे, संध्या कुलकर्णी, संगीता वनारसे, सुजाता चोरमले, अश्विनी सावंत, अर्चना लोकरे, अस्मिता जवकर, शुभांगी वैकर, भाग्यश्री येवले, राजश्री गवळी, सुलोचना चोरमले, भारती लोकरे अशा सर्व महिला करमाळा शहरातील

असून, कष्ट करून उपजिविका करणाऱ्या आहेत. त्यांचा बचत गट उभा करून त्यांना सर्व प्रकारचे शासनाच्या अर्थसहाय्य मिळवून देऊ म्हणून अश्विनी भालेराव हिने गोड बोलून महिलांचा बचत गट उभा केला. सुरुवातीला तिने बचत गटाच्या

माध्यमातून छोट्या प्रमाणात कर्जही उपलब्ध करून दिले. त्यानंतर अश्विनी भालेराव हिने प्रत्येक महिलेला एकटी एकटीला गाठून भावनिक बोलून मी अडचणीत आहे, मला सहकार्य करा, मी तुमचे सर्व पैसे फेडीन तुमच्या नावावर कर्ज घेते त्यास

तुम्ही संमती द्या, असे गोड बोलून व कोणालाही सांगू नका माझ्या इज्जतीचा प्रश्न आहे, असे म्हणून अश्विनी भालेराव हिने आमच्याकडून बँकांचे व पतसंस्थांचे कर्जाचे फार्म भरून घेतले. एवढेच नाहीतर आमचे कर्जही मंजूर केले. मंजूर झालेले कर्ज

स्वतःच घेऊन मी त्याचे हप्ते भरते, तुम्ही काही काळजी करू नका, असे म्हणून आमच्या नावावर लाखो रुपयाचे कर्ज घेतले आहे व ते कर्ज फेडले नाही. आता ती फरार झाली आहे. याप्रकरणी तिच्यावर कारवाई व्हावी व तिला अटक करावे, यासाठी सर्व

महिला जिल्हाधिकाऱ्यांना पंधरा दिवसांपूर्वीच आमरण उपोषण करणार असल्याबाबतचे निवेदन दिले आहे. आजपर्यंत अश्विनी भालेराव हिच्यावर नव्याने गुन्हा दाखल झालेला नाही व पूर्वीच्या गुन्ह्यात अटक झाली नाही. त्यामुळे सर्व महिला आज 14 ता. पासून तहसील कार्यालय समोर आमरण उपोषणास बसत आहोत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *