
करमाळा प्रतिनिधी
प्रत्येक भारतीयांसाठी स्वाभिमानाचा दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिन होय अनेक हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानामुळेच हे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे. स्वातंत्र्याचा आनंद घेत असताना आपण प्रत्येकाने सदैव त्यांचे स्मरण केले पाहिजे. सर्व

हुतात्म्यांना शतशः नमन. हे स्वातंत्र्य अबाधित राहो हीच सदिच्छा असे प्रतिपादन स्नेहालय स्कूलच्या मुख्याध्यापिका धनश्री जयंत दळवी यांनी व्यक्त केले स्नेहालय न्यु इंग्लिश स्कूल मध्ये 15 आँगस्ट निमित्त मुख्याध्यापिका दळवी यांच्या हस्ते

ध्वजारोहण करण्यात आले होते. यावेळी प्रथम स्नेहालय स्कूलचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी यांच्या हस्ते भारत माता व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे जोत्सना बनकर उपस्थित होत्या. याप्रसंगी

काही विद्यार्थ्यांनी सुभाषचंद्र बोस, भगतसिंह, सैनिक, आदि थोर पुरूषांची वेशभूषा केली. काही विद्यार्थ्यांनी देश भक्ती वर संगीत व नृत्य तसेच देश स्वातंत्र कसा झाला तसेच देशासाठी कोन्ही कोन्ही बलिदान दिले याची माहिती काही विद्यार्थ्यांनी

व शिक्षकांनी दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला होता. यावेळी सहशिक्षिका शिवांगी कांबळे, शुभांगी खळदकर, अमृता पाटील, अश्विनी महामुनी, त्रिवेणी दळवी, रूपाली जगताप, सविता पवार, अंजुम कांबळे, रोहिणी गरड, राहुल पलंगे, कृष्णा पवार आदि कर्मचारी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.