
ऊस बिले मिळण्यासाठी साखर आयुक्त पुणे यांना शेतकऱ्यांचे शिस्ट मंडळ सोमवारी भेटणार
करमाळा प्रतिनिधी : थकीत ऊस बिले मिळाली पाहिजेत म्हणुन करमाळा येथे बैठक घेण्यात आली सदर बैठकीला मार्गदशन बहुजन संघर्ष सेना जिल्हा अध्यक्ष रजाभाऊ कदम यांनी केले करमाळा तलुक्यातील शेतकऱ्यांना उसाची बिले मिळाली पाहिजेत म्हणुन वेळोे वेळी रस्ता रोको ,मोर्चे काढले परंतु गेंड्याची कातडी असणाऱ्या मकाई, कमलाई, घागरगाव, या

कारखान्याच्या चेअरमनला शेतकऱ्याची दया आली नाही शेवटी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन साखर आयुक्त पुणे यांना सोमवारी भेटणार आहोत साखर आयुक्तांच्या समोर करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची उसाची बिले न मिळाल्यामुळे कशी दयनीय अवस्था झाली आहे याची हकीगत साखर आयुक्त यांना सांगणार आहोत व तातडीने मकाई, कमलाई, घागरगाव, साखर कारखान्यावरती कारवाई करावी अशी विनंती करणार आहोत. यापूर्वी साखर आयुक्त यांनी आर आर सी प्रमाणे मकाई, कमलाई, साखर कारखान्यावरती कारवाई केली आहे परंतु तहसीलदार यांच्या संत गतीने चालू असलेल्या कारवाई मुळे शेतकऱ्यांना ऊसाची बिले मिळत नाहीत.
दत्त मंदिर येथील शेतकऱ्यांची बैठक संपवून शेतकऱ्याचे शिष्टमंडळ नायब तहसीलदार निकम साहेब यांना भेटले त्यावेळेस नायब तहसीलदार निकम साहेब यांनी सांगितले आजच कमलाईच्या साखरेचा निलाव चालू आहे ही सर्व प्रक्रिया करमाळा तहसीलदार यांच्या निग्रानि खली चालू आहे लवकरच एक महिन्याच्या आत कमलाई साखर कारखान्याची थकीत ऊस बिले शेतकऱ्यांना मिळतील असे सांगितले
मकाई साखर कारखान्यावरती आर आर सी प्रमाणे कारवाई चालू असून त्यांना तीन वेळा नोटीस बजवलेली आहे परंतु मकाईकडे साखरच शिल्लक नाही त्यामुळे अखेर मकाई कारखान्याची प्रॉपर्टी जप्त करावी लागणार आहे शेतकऱ्यांचे उसाची बिले देण्याची व्यवस्था जप्तीच्या माध्यमातून केली जाईल साखर आयुक्त जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे शेतकऱ्यांना बिल मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत असे नायब तहसीलदार निकम साहेब यांनी सांगितले.
मात्र शेतकऱ्यांनी निर्णय घेतला शिष्टमंडळ राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली साखर आयुक्त पुणे यांना भेटणार असा निर्णय झाला.
आज जम्मु काश्मिरचे नायब राज्यपल करमाळा येथे आले असल्याने शासकीय विश्राम गृह सर्व बुक होते अखेर दत्त मंदीर येथे बैठक झाली एकत्र जमण्यास पोलिसांची विचारपूस चालू होती राज्यपाल यांचा दौरा त्याच मार्गाने होता शेतकऱ्यांना बैठकीस उपस्तीत राहण्यास पोलिस बंदोबस्ता मुळे अडथळा निर्माण झाला तरी सुद्धा शेतकरी उपस्तीत राहिले पोलिस बंदोबस्त मोठा होता.
या वेळेस बैठकीला उपस्तित आदिनाथाचे मा.संचालक विठ्ठल शिंदे,रेवण पाटील,भीमरव घाडगे, सुंदरदास काळे, गफूरभाई शेख ,संदीप मरकड पाटील,निलेश पडवले,झरेचे सरपंच भारत मोरे,शत्रुघ्न कोकरे,दत्तात्रय बदे, सतीश चौधरी,भीमराव लवळे,अप्सर शेख,कल्यान चोरमले, दादा पावर,आतुल कोठावले,विष्णू रंदवे, विनोद शिंदे, भगवान डोंबाळे ,रमेश भोसले,भाऊ हजारे आदी बहू संख्य शेतकरी उपस्तीत होते.