राज्यपाल मनोज सिन्हा यांनी घेतली देवी कुटुंबियांची सांत्वनपर भेट

करमाळा प्रतिनिधी

दि. ११ रोजी जम्मू काश्मिरचे राज्यपाल मनोज सिन्हा तसेच भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी देवी

कुटुंबियांची त्यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट घेतली .

रा.स्व.संघाचे माजी सहसरकार्यवाह मदनदास देवी यांचे निधन झाले. या पार्श्वभुमीवर राज्यापाल मनोज सिन्हा व विनोद तावडे यांनी देवी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.

यावेळी मनोज सिन्हा यांनी मदनदासजीच्यां आठवणीनां उजाळा दिला. कार्यकर्ता ते विविध राजकीय महत्वाच्या पदावरील प्रवासात मदनदासजी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहीले. भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मदनदासजीचें कार्य

आम्हा सर्व कार्यकर्त्यांना सदैव प्रेरणा देत राहील अशा भावना व्यक्त केल्या.

यावेळी मदनदासजी यांचे जेष्ठ बंधु खुशालदास देवी, पुतण्या राधेशाम देवी परिवारातील सर्व सदस्य नातेवाईक तसेच रा. स्व.

संघाचे ता. संघचालक डॉ.श्रीराम परदेशी, कार्यवाह प्रमोद फंड, भाजपा आमदार सचिन कल्याणशेट्टी, प्रचारक अमोल विठाले उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *