करमाळा प्रतिनिधी
मांगी येथे करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी आज मांगी येथे बिबट्याने हल्ला केलेल्या नागेश बागल यांच्या शेतात भेट दिली व वन विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांना कॅमेरे बसविण्याच्या सूचना दिल्या व पिंजरे
वाढीव बसविण्यात सांगितले. यावेळी वन विभागाचे अधिकारी वन अधिकारी लटके साहेब, कुरले, सुजित तात्या बागल, अभिमान अवचर, तुषार शिंदे, सुरज ढेरे, आदेश बागल, नागेश बागल, पोलिस पाटील आकाश शिंदे, मनोज शिंदे व शेतकरी वर्ग उपस्थित होता