करमाळा प्रतिनिधी
जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा करमाळा भाजपाचे अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या निधीतून तालुक्यातील मौजे बिटरगाव येथे जुना करमाळा रस्त्याचे आज उद्घाटन आज त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चिवटे म्हणाले की, केंद्रात व राज्यात
आता भाजपा सरकार आहे. समाजातील प्रत्येक वंचीत शोषित घटकासाठी सरकार अनेक योजना तयार करत आहे. त्याचा लाभ लोकांनी घेतला पाहिजे.कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अडचण येत असल्यास लोकांनी भाजपा कार्यकर्ते
किंवा थेट माझ्याशी संपर्क करावा. जेष्ठ नागरिकांसाठी संजय गांधी निराधार योजना, शेतकऱ्यांसाठी सेस फंडातून 50% अनुदानवर औजारे, बांधकाम कामगासाठी अनेक योजना आहेत त्याचा लाभ गरजंनी घ्यावा असे आवाहन त्यांनी उपस्थित
ग्रामस्थांना केले. यावेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, सोशल मीडिया संयोजक नितीन झिंजाडे उपस्थित होते. ग्रामस्थानी यावेळी उपस्थित मान्यवारांचा सत्कार केला. यावेळी बिटरगावचे चे सरपंच डॉ. अभिजित मुरूमकर, ग्रामपंचायत सदस्य, युवक व ग्रामस्थ आदी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.