करमाळा प्रतिनिधी

करमाळा नगरपरिषदेच्या मालकीची गट नंबर ३७७/१ मधील चार गुंठे जागा रफीक सय्यद व इतर तीन जणांनी भाऊसाहेब मोटे रा. दिवेगव्हाण यांना रजिस्टर साठेखत करुन विकण्याचा प्रयत्न केला असुन संबंधितावर कार्यवाही करण्यात यावी

यासाठी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी माढा विभाग कुर्डूवाडी तहसीलदार करमाळा मुख्याधिकारी करमाळा यांच्याकडे २९ जुलै २०२२ पासुन पत्र व्यवहार करत असुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. २६ जानेवारी २०२३रोजी उपोषण

दिनांक १७ मे २०२३ रोजी आत्मदहन करण्या बाबत पत्र व्यवहार केला होता परंतु केवळ आश्वासन देण्या पलीकडे काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्यदिनी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याची माहीती तक्रारदार सिंकदर सय्यद यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना सय्यद म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल तसेच संबंधित सर्व जबाबदार अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे कळवुन सुध्दा माझ्या निवेदनाचा अद्याप

पर्यंत प्रशासनाकडुन कोणतीही दखल न घेतल्यामुळे मी १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण नंतर तहसील कार्यालयासमोर सह कुंटुब ही आत्मदहन करणार आहे, असे ते यावेळी म्हणाले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *