कमलाई नगरी प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील नाभिक समाजाची एक निरागस कन्या जी स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी नोकरी करत होती त्या मुलीवर पाळत ठेवून तिचे अपहरण करून तिच्यावर अन्याय अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्या करून
तीचे प्रेत खाडीमध्ये टाकून दिले होते. त्याचा योग्य तो तपास व्हावा आणि अपराध्याला फाशीची शिक्षा व्हावी अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री यांना प्रशासनातर्फे देण्यात आले. हे निवेदन जिल्हाधिकारी आणि डीएसपी कोल्हापूर यांनाही देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेश कार्यकारिणी, पश्चिम महाराष्ट्र आणि जिल्हा कार्यकारिणीचे सर्व सदस्य तसेच महिला आघाडीतील सर्व जिल्हा कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.