करमाळा प्रतिनिधी

श्रीराम प्रतिष्ठान आयोजित बांधकाम कामगार नोंदणी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, बांधकाम कामगार मेळाव्यासाठी आलेल्या सर्व बांधकाम कामगारांच्या सोयीसाठी पुढील पाच दिवस बांधकाम कामगार नोंदणी मेळावा सुरू ठेवणार असल्याची माहिती श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी होत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन गणेश चिवटे यांनी बांधकाम कामगार आयुक्त यांच्याशी चर्चा करून या मेळाव्याचे आयोजन केले होते.

या बांधकाम कामगार मेळाव्यासाठी तालुक्यातील हजारो बांधकाम कामगार उपस्थित होते. या बांधकाम कामगारांना मार्गदर्शन करण्यासाठी सोलापूर बांधकाम कामगार आयुक्त यांच्या कार्यालयातील अधिकारी सुनील हुकेरी, गायकवाड तसेच करमाळ्यातील इंजिनीयर विश्वासराव काळे, बाळासाहेब बेडकुते, प्रवीण गायकवाड, बाळासाहेब काळे, धर्मराज घाडगे, गणेश

सरडे, रोहित कोरपे,गोविंद अग्रवाल, निलेश माने,  उपस्थित होते.  बांधकाम कामगार नोंदणी मेळावा दिवसभर चालू होता परंतु जास्त अर्ज प्राप्त झाल्यामुळे बऱ्याच लोकांचे फॉर्म भरता आले नाहीत त्यामुळे हा कॅम्प पुढील पाच दिवस सुरू ठेवला जाईल, अशी माहिती गणेश चिवटे यांनी दिली आहे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, विलास आबा जाधव, विष्णू रणदिवे, आजिनाथ सुरवसे, धर्मराज नाळे, अमोल पवार, नितीन झिंजाडे, विनोद महानवर, जयंत काळे पाटील, सोमनाथ घाडगे, दिपक गायकवाड, किरण शिंदे,  भैय्याराज गोसावी, हर्षद गाडे, हरी आवटे,

अक्षय हानपुडे, सुनील नेटके, अशोक मोरे, संदीप काळे, नंदु इरकर, बजरंग मोहोळकर, अशोक साळुंखे, श्रीकांत किरवे, संतोष जवकर, शंभुनाथ मेरुकर, शैलेश राजमाने, हर्षल झिंजाडे, भरत गुंड, सुरज लष्कर, हनुमंत फरतडे, शरद कोकीळ, संजय किरवे, विनोद इंदलकर, आदी पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *