
करमाळा प्रतिनिधी
स्वामी चिंचोली (भिगवण) येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राणादादा सुर्यवंशी यांचा वाढदिवस शुक्रवार दि. २१ जुलै २०२३ रोजी विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठया थाटामाटात साजरा करण्यात आला. सदर वाढदिवसाचे औचित्य म्हणून

राणादादा यांचे निसर्गाप्रती असलेले प्रेम म्हणून त्यांच्याच संकल्पनेतून वाढदिवसाची सुरूवात संस्थेच्या परिसरात विविध प्रकारच्या रोपटयांचे वृक्षारोपण करून करण्यात आली. सदर वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.

रामदास झोळ, सचिव माया झोळ, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर तसेच संस्थेतील सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच राणादादा सुर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे समाजाला आपण काहीतरी देणे असल्याची वृत्ती व

त्यांची पिडीत व दुर्लक्षित महिलांसाठी व त्यांच्या मुलांसाठी काहीतरी करण्याची तळमळता म्हणून बोरी ता. इंदापुर येथील पिडीत महिलांच्या मुलांसाठी चालविण्यात येत असलेल्या बालविकास केंद्र येथे शिकत असलेल्या मुलांना अधिक स्वच्छ

पिण्याच्या पाण्याच्या सोय व्हावी म्हणून दत्तकला शिक्षण संस्थेतर्फे २५ लीटरचा वॉटर प्युरिफायर प्रत्यक्ष फिटींग करून भेट म्हणून देण्यात आला व उपस्थित असलेल्या सर्व मुलांसमवेत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला व त्यांना विविध

प्रकारच्या खाऊचे वाटप करण्यात आले. त्यानंतर राणादादा सुर्यवंशी यांनी प्रत्यक्ष व्हिडीओ कॉन्फरन्स कॉलद्वारे संवाद साधला व त्यांना त्यांच्या शिक्षणासाठी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले. सदर कार्यक्रमाप्रसंगी दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी म्हणून प्रा. रोहन जाधव, प्रा. हेमंत भोसले, प्रा. नितीन वाघमोडे, चंदुलाल धुमाळ, मंगेश जगताप तसेच सदर बालविकास केंद्र चालविणाऱ्या सामाजिक संस्थेने सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.