
रवींद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशासकीय पदी नियुक्ती
करमाळा प्रतीनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावंत रावगाव तालुका करमाळा येथील सुपुत्र रवींद्र दौलती पवार यांची राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी चालू राजकीय घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशासक

पदावर बढती देण्यात आली आहे, असे आशयाचे पत्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुख्य कार्यालयात प्रदान करण्यात आले. रवींद्र पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कट्टर समर्थक असून ते

राजकारणात शरद पवार यांना गुरु मानतात त्यांनी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पाच वेळा चेंबूर-कुर्ला विभागाचे नगरसेवक पद, स्थायी समितीचे अध्यक्ष, बेस्टचे चेअरमन,महानगर पालीकेत सक्षम असे विरोधी पक्ष नेतेपद, साहित्यरत्न

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक कृती समितीचे सचिव, जिल्हा निरीक्षक या महत्त्वाच्या पदावर उत्कृष्ट असे कार्य केलेले आहे. त्यांच्या या कार्याची व निष्ठेची दखल घेऊन शरद पवार यांनी त्यांच्या वर पक्षाची मोठी जबाबदारी सोपवलेली आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्या मुळ गावी रावगाव ता. करमाळा येथे मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला.

