महाराष्ट्र राज्यस्तरीय ए. टी. एस. प्रज्ञाशोध परिक्षेत स्नेहालय न्यू इंग्लीश स्कूलचे नेत्रदीपक यश

करमाळा प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यस्तरीय ए. टी. एस. प्रज्ञाशोध परिक्षेत प्रशालेचे एकूण 11 विद्यार्थी पात्र झाले आहेत.

त्यामध्ये गुणवंत विद्यार्थीनी अदविता मिलिंद झालटे इ. ३ री जिल्ह्यात ३री, आर्यन अतुल राखुंडे इ. २ री केंद्रात पहिला, अमोदिनी प्रदीप सागडे इ. ४ थी केंद्रात तिसरी, प्रणिती माकुडे, हर्षदा बनकर, श्रेयश पवार, शुभम चव्हाण, ईश्वरी माकुडे, कार्तिक चव्हाण, अमिन पठाण,  साईराज विदवत हे आहेत.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याधापिका धनश्री दळवी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.        

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. जयंत दळवी व शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *