संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७३ व्या संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त हरिनाम सप्ताह सोहळा आयोजित

करमाळा प्रतिनिधी

करमाळा -श्री संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई यांचा 673 वा समाधी सोहळा श्री संत नामदेव शिंपी समाज करमाळा यांच्याकडून हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.

या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त हरिनाम सप्ताहाची सुरूवात दिनांक ९ जुलै रोजी सुरुवात झाली आहे. या सप्ताहमध्ये दररोज हरिपाठ भजन कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम नियोजन ह.भ.प.आगम महाराज जेऊर तर

किर्तनसोबत खोलेश्वर भजनी मंडळ, हनुमान भजनी मंडळ, गोरोबा काका भजनी मंडळ, करमाळा  मृंगाचार्य – शुभम शहाणे, नंदु घडगे, सुधा करंडे, धनय शेळके,  हर्मोनियम पांडुरंग जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. तसेच शनिवार

दिनांक १५ जुलै रोजी श्री संत नामदेव शिंपी महाराज व परिवार व संत जनाबाईयांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त ह.भ.प.मनसुख महाराज दहे (श्रीरामपुर ) यांचे काल्याचे किर्तन होणार आहे व महाप्रसादाचे आयोजन शिंपी समाजाचे विश्वस्त

रमेश गणपत गानबोटे व गानबोटे परिवार करमाळा यांच्या कडून करण्यात आले आहे. अशी माहिती सागर नारायण वडे यांनी दिली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *