मांगी तलावाचा कुकडी प्रकल्पात समावेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात गणेश चिवटे यांची माहिती        

करमाळा प्रतिनिधी

करमाळा भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या प्रयत्नाला यश येत असून मांगी तलावाचा कुकडी प्रकल्पात समावेश करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. याबाबत गणेश चिवटे यांनी मांगी तालाव लाभधारक गावातून स्वाक्षरी मोहीम

राबवून 10 हजार सह्यांचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. तसेच माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विशेष लक्ष घालून पाठपुरावा केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नाईक

निंबाळकर व सिंचन विभागतील अधिकारी यांची आज बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेरजलनियोजन करून मांगी तलाव कुकडी प्रकल्पात समाविष्ट करण्यासबंधी अधिकाऱ्यांना अधिकृत सूचना दिल्या आहेत.

मांगी तलावावर अवलंबून असलेल्य 20-25 गावातील शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. यामुळे या भागात आनंदाचे वातावरण झाले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व

भाजपचे तालुकाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांचे या भागातील नागरिक आभार मानत आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *