कै.बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानने गरजू रुग्णांच्या सोईसाठी मोफत अत्याधुनिक बेड उपलब्ध करून देण्याचा अनोखा उपक्रम राबविला

करमाळा प्रतिनिधी

विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असणाऱ्या कै.बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानने गरजू रुग्णांच्या सोईसाठी मोफत अत्याधुनिक बेड उपलब्ध करून देण्याचा अनोखा उपक्रम राबविला असून, या मोफत अत्याधुनिक बेड लोकार्पण सोहळा पत्रकार संघाच्या हस्ते नुकताच संपन्न झाला आहे.

करमाळा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन, या सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. यावेळी सामाजिक, राजकीय व शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी कै.बाबूराव तात्या गायकवाड प्रतिष्ठाणच्यावतीने अध्यक्ष सचिन गायकवाड यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले व आपण करमाळा शहर व तालुक्यातील गरजु रुग्णांसाठी मोफत बेड सुविधा उपलब्ध करुन देत आहोत, असे आपले विचार व्यक्त केले.

या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष प्रशांत ढाळे, माजी नगरसेवक अतुल फंड, महादेव फंड, नानासाहेब मोरे, संजय घोलप, सचिन जगताप, प्रविण कटारिया, अमोल यादव, मराठा सेवा संघाचे सचिन काळे, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, जयंत दळवी, नासिर कबीर, संजय शिंदे, विशाल घोलप, ॲड.सचिन हिरडे, संजय चौगुले, अशोक मुरुमकर, नागेश चेंडगे आदि पत्रकार उपस्थित होते. याप्रसंगी पत्रकार महेश चिवटे, विशाल घोलप, सचिन काळे यांनी मनोगत व्यक्त करुन या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *